७. एचटीसी डिझायर 626 ड्यु्अल सिम
हा फोनही १,००० रुपयांनी स्वस्त झाला आहे. सध्या त्याची किंमत १३,९९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ३ जीबी इतका रॅम आहे. याची मेमरी ३२ जीबी इतकी वाढवली जाऊ शकते.
2/7
६. एचटीसी डिझायर 728 ड्युअल सिम
हा फोनसुद्धा १,००० रुपयांनी स्वस्त झाला आहे. २,८०० mAH इतकी जबरदस्त बॅटरी लाईफ असलेला हा फोन सध्या १६,९९९ रुपयांना मिळतोय. याचे वैशिष्ट्य म्हणजे मेमरी कार्डने याची मेमरी २ टीबी इतकी वाढवता येते.
3/7
५. नेक्सस 5X (16 GB)
३१,९९९ रुपयांना लाँच झालेला हा फोन सध्या केवळ २१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. लाँच झाल्यापासून केवळ एका महिन्यात या फोनची किंमत कंपनीकडून कमी केली गेली आहे. गोरिला ग्लास स्क्रीन असलेला हा फोन १२.३ मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यासोबत येतो.
4/7
४. यू-युफोरिया
सध्या या फोनची किंमत आहे केवळ ६,४९९ रुपये. ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये २२३० mAH ची बॅटरी आहे. याची मेमरी १२८ जीबी इतकी वाढवता येते.
5/7
३. शाओमी Mi4i
शाओमी या चीनमधील कंपनीने हा फोन केवळ भारतीय बाजारपेठेत उतरवलाय. ५.० अँड्रॉईडवर चालणारा हा फोन सध्या १,००० रुपयांनी स्वस्त झालाय आणि तो १०,९९९ रुपयांना मिळतोय.
6/7
२. मोटो जी टर्बो
मोटो जी - ३ ची सर्व फिचर्स असलेला हा फोन सध्या १४,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फोनला २ जीबीचा रॅम आहे.
7/7
१. मोटो जी ३
मोटोरोलाचा हा ८ जीबी फोन सध्या ९,९९९ रुपयांना मिळतोय. तर याचं १६ जीबी मॉडेल १०,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याच फोनची टर्बो एडिशन लाँच झाल्यावर या फोनच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. या फोनला एचडी डिस्प्ले असून याची बॉडी वॉटर रेझिस्ट्ंट आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.