मॅरिड लाईफ बोअर झालीये तर या टिप्स वापरा

जर तुमचा नवरा तुम्हाला वेळ देत नाहीये, तुमचे वैवाहिक जीवन कंटाळवाणे झालेय तर या सोप्या टिप्स तुमच्या जीवनात पुन्हा आनंद घेऊन येतील.

Updated: Mar 3, 2018, 11:44 AM IST
मॅरिड लाईफ बोअर झालीये तर या टिप्स वापरा title=

मुंबई : जर तुमचा नवरा तुम्हाला वेळ देत नाहीये, तुमचे वैवाहिक जीवन कंटाळवाणे झालेय तर या सोप्या टिप्स तुमच्या जीवनात पुन्हा आनंद घेऊन येतील.

चांगली वर्तणूक

लग्नच नव्हे तर कोणतेही नाते हे प्रेम आणि विश्वासावर टिकते. यामुळे नात्याचा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांसोबतची वर्तणूक एकसारखीच ठेवली पाहिजे. इतरांसोबत ज्याप्रमाणे तुम्ही चांगले वागता तशीच वागणूक तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ठेवली पाहिजे. 

सरप्राईज द्या

जेव्हा शक्य होईल तेव्हा एकमेकांना सरप्राईज द्या. यामुळे तुमच्या नात्यातील ओलावा कायम राहील. सरप्राईज केवळ नवऱ्यानेच द्यावे असे काही नाही तुम्हीही कधीतरी आवडत्या सिनेमाचे तिकीट बुक करुन अथवा आवडीची डिश बनवून पतीराजांना खुश करु शकता. लक्षात ठेवा छोट्या छोट्य़ा गोष्टीच नाते अधिक दृढ करतात.

अनुभव शेअर करा

सध्याच्या व्यस्त लाईफमुले प्रत्येकजण तणावात असतो. यावेळी आपल्या चांगल्या आठवणी पार्टनरसोबत शेअर करा. एकमेकांशी संवाद साधा. संवादाने दुरावा कमी होतो. दिवसभरात काय घडले यावर एकमेकांशी बोला.