मुलींना Boyfriend च्या 'या' 3 सवयी अजिबात आवडत नाहीत!

कालांतराने नात्यात काही गोष्टींमुळे दुरावा येऊ लागतो. यामध्ये इतका दुरावा निर्माण होतो की नातं तुटण्याच्या वळणावर येतं.

Updated: Aug 14, 2022, 12:35 PM IST
मुलींना Boyfriend च्या 'या' 3 सवयी अजिबात आवडत नाहीत! title=

मुंबई : प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी काही मुलगी नक्कीच असते जिला तो भेटतो आणि ती त्याच्या आयुष्यात खूप महत्वाची बनते. कालांतराने ते एकमेकांना आवडू लागतात. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर दोघेही एकमेकांसोबत प्रेमळ क्षण जगू लागतात. काही काळ प्रत्येक जोडप्याचं नातं खूप चांगलं असतं पण कालांतराने नात्यात काही गोष्टींमुळे दुरावा येऊ लागतो. यामध्ये इतका दुरावा निर्माण होतो की नातं तुटण्याच्या वळणावर येतं.

जर तुमच्यात जास्त भांडण होत असेल तर त्याचं कारण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून ती कारणं समजून घेऊन ती दूर करता येतील. आज आम्ही अशाच काही गोष्टी सांगत आहोत, ज्यामुळे अनेकदा कपल्समध्ये अंतर निर्माण होतं.

पर्सनल स्पेस न देणं 

रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर मुलं अनेकदा हे चुकीचं करतात. त्याचा असा विश्वास आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडने दिवसभर त्याच्याशी बोललं पाहिजे. जर एखाद्या वेळी ती व्यस्त असेल, कॉल किंवा मेसेजेसना उत्तर देऊ शकत नसेल तर मुलांनी हे समजून घेतलं पाहिजं की, त्यांच्या गर्लफ्रेंडच्या आयुष्यात इतरंही लोक आहेत, तिचे स्वतःचं आयुष्य आहे. जर तुम्ही तिला पर्सनल स्पेस दिली नाही, तर ती नातेसंबंधातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल.

संशय घेणं

गर्लफ्रेंड बराच वेळ बिझी असताना अनेक मुलं तिच्यावर संशय घेऊ लागतात. मग ते स्क्रिनशॉट्स पाठवणं, नंबर पाठवणं अशी कामंही करू लागतात. अशा परिस्थितीत मुलीला वाटू लागतं की, जर तिचा पार्टनर तिच्यावर संशय घेतोय. अशा परिस्थितीत मनात विविध प्रकारचे विचार येऊ शकतात आणि नातेसंबंध कमकुवत होतात.

इंटीमेसीसाठी बळजबरी करणं

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किंवा मैत्रिणीशी जवळीक साधण्यासाठी जबरदस्ती केली तर हे नाते कठीण होऊ शकतं हे उघड आहे. असा दबाव आणून, नातं फार काळ टिकत नाही. त्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला यासाठी कधीही जबरदस्ती करू नका.