शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर...? पाहा पुण्यात काय घडलंय

शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर तो तुमच्या जीवावरही बेतू शकतो. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे  

शिवराज यादव | Updated: Dec 6, 2024, 08:45 PM IST
शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर...? पाहा पुण्यात काय घडलंय title=

शरीर तंदुरुस्त राहावं यासाठी तुम्ही व्यायाम करत असाल तर चांगलंच आहे. मात्र, हाच व्यायाम करताना काळजी घेतली नाही आणि शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर तो तुमच्या जीवावरही बेतू शकतो. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे, पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.....! 

पुण्यातील हिंजवडीमध्ये घडलेल्या दोन घटनांनी शरीरयष्टीकडे लक्ष देणा-या अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेल्या 30 वर्षीय पेहलवान विक्रम पारखी यांचा जिममध्ये व्यायाम  केल्यानंतर हार्टअॅटकनं मृत्यू झाला आहे. तर व्यायाम करून घरी परतल्यानंतर एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणा-या 44 वर्षीय  संजीव कुमार या अभियंत्याचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये दोघांचाही मृत्यू व्यायाम केल्यानंतर झाला आहे.   

चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम,शरीरामध्ये मसल दिसावेत यासाठी घेतलेली चुकीची औषधं, शरीराची क्षमता लक्षात न घेता केलेला जास्तीचा व्यायाम,सोशल मीडियाचा प्रभाव अशी विविध कारणं मत्यूमागे असू शकतात.

दुसरीकडे हृदयरोग तज्ज्ञांनी अशा घटना चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होत असल्याचे स्पष्ट केलं आहे. हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवत व्यायाम करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. हृदय रोगासंबंधी कुटुंबात काही पार्श्वभूमी असल्यास योग्य तपासण्या केल्यानंतर व्यायामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

तुम्हाला बलदंड शरीरयष्टी हवी असेल तर  जीममध्ये अवश्य जा. मात्र, त्याच वेळी जीम ट्रेनच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा. नाही तर तुमचा हकनाक जीव जावू शकतो