RJ Malishka Rap Song on Pune Porsche Car Accident : गेल्या बऱ्याच दिवसापासून पुण्यातील पोर्श कार अपघातामुळे मोठा वाद पेटला आहे. संपूर्ण देशात या घटनेनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. 19 मे रोजी एका अल्पवयीन मुलानं मद्यधुंद अवस्थेत पोर्श गाडी चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या एक तरुण आणि तरुणीची धडक दिली. या अपघातात त्या दोघांचेही निधन झाले. या प्रकरणात सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्ती त्यांची संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तर रोज काही तरी नवीन गोष्ट समोर येताना दिसते. त्यात सगळ्यांना संताप या गोष्टीचा आला की मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत समोरच्या दुचाकीला धडक देणाऱ्या अल्पवयीन मुलाला फक्त निबंध लिहायला सांगितला. 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर त्याला जामीन मिळाला. यानंतर सगळीकडे आक्रोश पाहायला मिळत आहे. अशात आता आरजे मलिष्कानं पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात तिच्या हटके स्टाईलमध्ये एक गाणं लिहिलं आहे.
आरजे मलिष्का हिच पुण्यातील पोर्शे कार अपघातावरील रॅप सोशल मीडियावरही सध्या बरंच चर्चेत आलं आहे.
जब मैं छोटा बच्चा था, बडी शरारत करता था.
मेरी गाडी ठुक ही जाती, बचाने आता बाप.
मी पुण्यामध्ये राहतो, माझ्या बापाचीच खातो,
माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा.
पोर्शे बाहेर घेऊन गेले, दोन तरुण मेले,
पिऊन होता गाडीत बसला, इसमे कोई नही मसला.
ब्लेम ड्रायव्हर पे ठोकेंगे, मेरी लाईफ थोडी रोकेंगे.
वकिल आहेत, आहे पैसा, तो डर कैसा और किसका?
जिसने parody बनाया, इसपे एअआयआर लगाया
अरेस्ट झाले हॉटेलवाले, दोन डॉक्टर अरेस्ट झाले, सस्पेंड झाले पोलीसवाले,
पण मी?... फक्त लिहिला निबंध, पिझ्झाचा झाला प्रबंध,
आय एम स्टील नाबालीक ना... मैं तो बच्च हु ना...
जिसने parody बनाया उपसे एफआयआर लगाया,
कारण बापाचा पैसा... तु रोकेगा कैसे???
पोर्शे कोणाची...बापाची..रस्ता कोणाचा..बापाचा...
वकिल कोणाचा... बापाचा... Law and Order कोणाचा बापाचा...
आआआहा... पब्लिकचा... तुझ्या बापाचे पैसे... देख रोकेंगे कैसे...
कभी पोर्शे कभी Pathole, कभी Politics... कोई और झोल...
Public Memory is Very Short भैय्या... सबसे बडा रुपय्या...
मगर इस मेमरी की ना डुबे नैय्या.. इसलिए मै हुं ना...."
हेही वाचा : नताशानं हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटावर पुन्हा दिली हिंट! तर संतप्त नेटकरी म्हणाले...
मलिष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी देखील त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'अशा विषयावर तू व्हिडीओ केलास ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुला सलाम.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'यावर चित्रपट करण्यात येईल ज्याचं नाव असेल लापता जस्टिट' तर काही नेटकऱ्यांनी मलिष्काचा विरोध केला आहे. त्यांना तिचं असं या विषयावर गाणं लिहिणं आवडलं नाही. त्यांचं म्हणणं आहे त्या 'दोन तरुणांचा यात जीव गेला आहे. आपण त्यांच्या कुटुंबाचा तरी विचार करायला हवा.'