Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द

Mumbai Local Mega Block: आज तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. कारण आज प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.  

श्वेता चव्हाण | Updated: Jan 28, 2024, 09:18 AM IST
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द  title=

Mumbai Local Mega Block News in Marathi: मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज (28 जानेवारी 2023) दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच मार्ग निश्चित करावा अन्यथा नाहक त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे मार्गावर

मुलुंड - माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्ग ( सकाळी 11.05 - दुपारी 03.55  वाजेपर्यंत)

मध्य रेल्वेने मुलुंड ते माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.15 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गाच्या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल वेळेच्या 15 मिनिटे उशीरा पोहोचतील. 

तर सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.  पुढे माटुंगा येथे जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटांत उशिरा येथे पोहोचतील. 

हार्बर लाइन मार्गावर

पनवेल - वाशी अप आणि डॉन हार्बर लाइन्स (सकाळी  11.05 - 04.05 वाजेपर्यंत)

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

पनवेलहून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा  बंद राहील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून  सकाळी 9.45 ते दुपारी 3.11 वा.  पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आज बंद राहतील.

ट्रान्स हार्बर

सकाळी 11.01 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून सुटनारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेलहून ठाण्याकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

पश्चिम रेल्वे

चर्चगेट - मुंबई सेंट्रल स्टेशन्स UP आणि डाऊन स्लो लाईन्स (सकाळी 10:35 -  दुपारी 3:35 )

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 पर्यंत ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि देखभालीसाठी 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

पुणे – लोणावळा  मेगाब्लॉक 

मध्य रेल्वेच्या पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी आज (28 जानेवारी 2024) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे – लोणावळा दरम्यान अनेक उपनगरी गाड्या रद्द राहतील.  

1) सकाळी 9.57 ला सुटणारी पुण्याहून लोणावळ्या लोकल रद्द राहील.

2) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 11.17 वाजता सुटणारी लोकल राहील.

3) पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी 3 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

4) तळेगावसाठी दुपारी 3.47 वाजता सुटणारी शिवाजीनगरहून लोकल रद्द.

5) दुपारी 4.25 वाजता सुटणारी पुण्यहूण लोणावळ्या लोकल रद्द राहील.

6) शिवाजीनगर ते लोणावळा 5.20 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

7) सकाळी 10.05 वाजता सुटणारी लोणावळा ते शिवाजीनगर लोकल रद्द राहील.

8) दुपारी 2.50 वाजता सुटणारी लोणावळा पुणे लोकल रद्द राहील. 

9) तळेगावहून पुण्याला 4.40 वाजता सुटणारी लोकल रद्द.

10) सायंकाळी 5.30 वाजता सुटणारी लोणावळ्याहून शिवाजीनगर करिता लोकल रद्द राहील.

11) सायंकाळी 6.08 वाजता सुटणारी लोणावळाहून शिवाजीनगर लोकल रद्द.

12) लोणावळाहुन पुण्यासाठी सायंकाळी 7 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.