भाजपच्या लोकांनी गर्दी टाळायला हवी; जनआशीर्वाद यात्रेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला

 केंद्रातील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारी पाळायला हवी. भाजपच्या लोकांनी याबाबत विचार करायला हवा. गर्दी टाळायला हवी, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

Updated: Aug 22, 2021, 01:45 PM IST
भाजपच्या लोकांनी गर्दी टाळायला हवी; जनआशीर्वाद यात्रेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला title=

 पुणे : केंद्रातील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारी पाळायला हवी. भाजपच्या लोकांनी याबाबत विचार करायला हवा. गर्दी टाळायला हवी, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. कोरोना वॉरियर्सना खासदार सुप्रिया सुळे यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. वाहतूक पोलीस, वॉर्ड बॉईज, महापालिकेचे सफाई कर्मचाऱी, डॉक्टर, स्मशानभूमीतील कर्मचारी यांच्यासह सुळे यांनी रक्षाबंधन साजरी केली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाषण केले. 

राष्ट्रवादीच्या महिला आणि युवतींनी कोरोना काळात मोठी मदत केली आहे. कोरोना ही मानवतेसाठी परीक्षा होती त्यातून बाहेर पडलो. कोरोना काळात ज्यांनी आपल्यासाठी सेवा बजावली आज त्यांचा सन्मान करण्यात आला. 

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेबाबात खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले आहेत. केंद्रातील जबाबदार मंत्र्यांनी गर्दी होऊ टाळायला हवी. भाजपच्या लोकांनी याबाबत विचार करायला हवा. असे म्हणत सुळे यांनी भाजपचे कान टोचले.

आपण जेव्हा सत्तेत असतो तेव्हा विरोधकांनी टीका करणं सहाजिक आहे. त्यांनी टीका करीत राहो. आम्ही सेवा करत राहू. त्यांचा यामागचा उद्देश काय आहे हे त्यांनाचा विचारा.आमचं सरकार दडपशाही करीत नाहीये, ते बोलले म्हणजे सत्य होत नाही. तसेच त्यांनी युती कोणाशी करावी हा त्यांचा प्रश्न आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. असे प्रत्युत्तरही सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.

यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागण्य़ा केल्या आहेत. ते त्यावर विचार करतील. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी यशोमती ठाकूर यांनी केलेल्या भाषणावर दिली.