बाबासाहेब पुरंदरे यांचा आज भव्य नागरी सत्कार; पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतही राहणार उपस्थित

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिवस आहे. बाबासाहेब आजच्या दिवशी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने पुण्यात त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन शिवसृष्टी येथे करण्यात आले आहे.

Updated: Aug 13, 2021, 11:00 AM IST
बाबासाहेब पुरंदरे यांचा आज भव्य नागरी सत्कार; पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतही राहणार उपस्थित title=

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिवस आहे. बाबासाहेब आजच्या दिवशी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने पुण्यात त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन शिवसृष्टी येथे करण्यात आले आहे.

 बाबासाहेब पुरंदरे यांचा भव्य नागरी सत्कार लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 
 
 हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सरकारवाडा , शिवसृष्टी, आंबेगाव, पुणे येथे होणार आहे. विशेष म्हणेज या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहणार आहेत.