खरेखुरे 'हिरो'! भारताचे 'रत्न' हरपले; रतन टाटा असे बनले जेआरडींचे उत्तराधिकारी, कधीच न पाहिलेले PHOTO

संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 

| Oct 10, 2024, 09:53 AM IST

संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 

1/8

खरेखुरे 'हिरो'! भारताचे 'रत्न' हरपले; रतन टाटा असे बनले जेआरडींचे उत्तराधिकारी, कधीच न पाहिलेले PHOTO

Young Ratan Tata how ratan tata became successor of jrd tata

 रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. रतन टाटा यांनी टाटा समूहाचे नाव जागतिक पातळीवर नेले. तसंच, भारताच्या आर्थिक विकासातही त्यांनी मोलाचा हातभार लावला. रतन टाटा हे जेआरडींचे उत्तराधिकारी कसे बनले हे आज जाणून घेऊया. 

2/8

Young Ratan Tata how ratan tata became successor of jrd tata

रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून १९५५ मध्ये डिप्लोमा केला.

3/8

Young Ratan Tata how ratan tata became successor of jrd tata

रतन टाटा यांनी १९६१ साली टाटा समूहाची प्रसिद्ध कंपनी टाटा स्टीलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ते १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेले. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीही मिळवली आहे.

4/8

Young Ratan Tata how ratan tata became successor of jrd tata

1970च्या दशकात रतन टाटा यांना टाटा समूहात व्यवस्थापकीय पद देण्यात आले. नॅशनल रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स (नेल्को) ही उपकंपनी त्यांनी सुरू केली. तसंच, ती उत्तम चालवूनही दाखवली. 

5/8

Young Ratan Tata how ratan tata became successor of jrd tata

 रतन टाटा यांनी दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडल्यानंतर जेआरडी टाटा यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांचे नाव पुढे केले. रतन टाटा यांनी सेवानिवृत्ती स्विकारल्यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा बनले

6/8

Young Ratan Tata how ratan tata became successor of jrd tata

आर्थिक दृष्टिकोनातून १९९१ हे वर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे होते. देशात उदारीकरण आणि खासगीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली आहे.

7/8

Young Ratan Tata how ratan tata became successor of jrd tata

रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली, जॅग्वार लँड रोव्हर, कोरस या कंपन्यांचे अधिग्रहण केले. त्यामुळं जगभरात टाटा समूहाचा विस्तार झाला. 

8/8

Young Ratan Tata how ratan tata became successor of jrd tata

रतन टाटा यांच्या नेतृत्वात 21 वर्षांच्या कालावधीत टाटा समूहाचा महसूल 40 पटीने व नफा 50 पटीने वाढला. रतन टाटा यांना भारत सरकारकडून 2000 साली पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवण्यात आले.