Photos: वाळवंटातील ही वास्तू भारतात आहे! तिचा वापर अन् इथल्या सुविधा तुम्हाला नक्कीच थक्क करतील

You Will Be Shock To See This Building In Desert And It's Use: वाळवंटात उभारण्यात आलेल्या या वस्तूचा फोटो पाहून तुम्हालाही तिच्याबद्दलची उत्सुकता वाटत असेल. ही वास्तू नेमकी काय आहे? ती अशी वाळवंटात का उभी केली आहे? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण या वास्तूबद्दलची अधिक एक बाब म्हणजे ती चक्क आपल्या देशात म्हणजेच भारतात आहे. जाणून घेऊयात या वास्तूबद्दल, तिच्या वापराबद्दल आणि त्यामध्ये पुरवल्या जाणाऱ्या सोयी, सुविधांबद्दल... या वास्तूबद्दल सविस्तर माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

| Oct 12, 2023, 10:21 AM IST
1/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

ही वास्तू राजस्थानमधील थारच्या वाळवंटात आहे. या ठिकाणी एकही एसी नाही. तरीही या वास्तूमध्ये रोज शेकडोच्या संख्येनं मुलं येतात असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ही वास्तू म्हणजे चक्क एक शाळा आहे.  

2/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

वाळवंटातील या शाळेचं नाव आहे, राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल! ही शाळा अमेरिकेतील ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या संस्थेच्या मदतीने उभारण्यात आली आहे.

3/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

जैसलमेरमधील कानोई गावातील ही शाळा वास्तूकलेचा आणि स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अंडाकृती आकाराची ही इमारत पिवळ्या खडकातून बांधण्यात आली आहे. जगभरामध्ये या शाळेची चर्चा होताना दिसते. या शाळेबद्दल अधिक जाणून घेऊयात...

4/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

वाळवंटात असलेल्या या राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूलमध्ये एकही एसी नाही. इमारतीमध्ये हवा खेळती राहवी म्हणून जाळीदार भींती बांधण्यात आल्या आहेत. या शाळेचं छतही फार खास आहे. या छताला अनेक ठिकाणी जाळीदार बांधकामाची शैली वापरण्यात आल्याने थेट सूर्यप्रकाश वर्गांमध्ये येतो.

5/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

राजस्थानमधील वाळवंटातील ही शाळा डायना कॅलोगच्या स्थापत्यकारांनी बांधली आहे. या शाळेच्या उभारणीसाठी अमेरिकेतील सीआयटीटीए या संस्थेनं मदत केली आहे. महिलांचे शिक्षण, आर्थिक विकास आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारी ही सेवाभावी संस्था आहे.

6/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

राजस्थानमधील या शाळेच्या बांधकामाच्या आधीची तयारी डायना कॅलोग कंपनीने 2014 साली सुरु केली. वेगवेगळ्या ठिकाणच्या भेटीगाठी, नियोजन, आराखडा या साऱ्या गोष्टींसाठी तब्बल 4 वर्षांचा कालावधी लागला. स्थानिक कामगारांच्या मदीतीने 2018 साली प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आणि वर्षभरामध्ये शाळा बांधून तयार झाली.

7/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूलला ग्यान सेंटर असंही म्हटलं जातं. या ठिकाणी बालवाडीपासून ते 10 वी पर्यंतच्या वर्गांमध्ये 400 मुली शिक्षण घेतात. या इमारतीमध्ये यंत्रमागासंदर्भातील छोटं संग्रहालय आणि एक संस्कृतिक हॉलही आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देत असल्याने स्थानिक कारागिरांसाठी एका जागा विक्री केंद्र म्हणूनही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

8/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

याच इमारतीमधील एका भागामध्ये स्थानिक महिलांना वीणकाम आणि कापडासंदर्भातील इतर कौशल्य शिकवण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आलं आहे. 

9/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या लग्नासाठी लाखो रुपयांचे डिझायनर ड्रेस शिवणारा प्रसिद्ध फॅशन डिझायनर साब्य साची या शाळेतील मुलींसाठी मोफत गणवेश डिझाइन करुन देतो. राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूलचा गणवेशही खास असून तो इतर शाळांप्रमाणे साचेबद्ध नाही.

10/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

सीआयटीटीएच्या वेबसाईटनुसार, दारिद्ररेषेखालील म्हणजेच ज्या कुटुंबाची वार्षिक कमाई ही 15 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यान आहे अशा कुटुंबातील मुलींना येथे मोफत सोयी पुरवल्या जातात. 

11/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

या शाळेची रचना, इमारतीमधील वर्गांबरोबरच शाळेकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधाही फार खास आहेत. वर्गांबरोबरच या शाळेत ग्रंथालय, कंप्युटर सेंटर आणि आजूबाजूच्या गावातून मुलींना शाळेत आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी मोफत बस सेवा पुरवली जाते.

12/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

सीआयटीटीए वेबसाईटनुसार शिक्षणाबरोबरच येथे शिकणाऱ्या 400 विद्यार्थींनींना उत्तम भोजन मिळावं यासाठी विशेष आहार त्यांना शाळेकडूनच दिला जातो. 

13/13

Photos Of Rajkumari Ratnavati Girls School In Jaisalmer Rajasthan

या शाळेची रचना, तिथे दिल्या जाणाऱ्या सोयी या सार्वांमधील मुख्य उद्देश म्हणजे ज्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणाला फारसं महत्त्वाचं मानलं जात नाही तेथील पालकांनी या साऱ्या गोष्टी पाहून तरी मुलींना शिक्षणसाठी पाठावावं हाच आहे. सध्या तरी हा हेतू साध्य होताना दिसत आहे.