बराक ओबामांनी ४१ वर्षाआधी घातलेल्या त्या जर्सीचा १ कोटी ४० लाखात लिलाव

Dec 07, 2020, 00:18 AM IST
1/5

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama)  यांची हायस्कूल जर्सीचा लिलाव करण्यात आला. जी जर्सी त्यांनी 1979 मध्ये शाळेच्या बास्केटबॉल मॅचदरम्यान घातली होती.

2/5

1 कोटी 40 लाख

1 कोटी 40 लाख

ओबामा (Obama) यांची जर्सी 192,000 डॉलर म्हणजे 1 कोटी 40 लाखांना विकली गेली आहे. कोणत्या ही जर्सीसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी बोली आहे. या जर्सीचा रंग पांढरा असून त्यावर 23 क्रमांक आहे.

3/5

विश्वविक्रम

विश्वविक्रम

रिटायर्ड एनबीए (NBA) चे दिग्गज माइकल जॉर्डन  आणि एनएफएल क्वार्टरबॅक कॉलिन कैपरनिक यांची जर्सीवरील लिलावाने विश्वविक्रम केला होता.  

4/5

10,240 डॉलरमध्ये लिलाव

10,240 डॉलरमध्ये लिलाव

साइन्ड एनबीए फायनल (NBA Final) जर्सीचा 38,400 डॉलरमध्ये लिलाव करण्यात आला. 1958 फीफा वर्ल्ड कप (1958 FIFA World Cup) मध्ये एका टीमच्या कर्णधाराचा आर्मबँड हा 10,240 डॉलरला विकला गेला होता.

5/5

ओबामांचं पुस्तक चर्चेत

ओबामांचं पुस्तक चर्चेत

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं पुस्तक चांगलंच चर्चेत आहे. ‘ए प्रॉमिस्डर लँड’ (A Promised Land)  पुस्तकातून त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.