WTC Final : रहाणे आणि शार्दुल यांनी वाचवली भारताची लाज; ओव्हलच्या मैदानावर मराठी खेळाडूंचा दणका

WTC Final : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात दोन मराठी खेळाडूंनी इंग्लंडच्या खेळाडूंची नाचक्की केली आहे. 

Jun 09, 2023, 18:25 PM IST
1/6

18 महिन्यांनी टीम इंडियामध्ये कमबॅक केलेल्या अजिंक्य रहाणेने आणि शार्दुल ठाकूरने ऑस्ट्रेलियाचं फॉलोऑन देण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.

2/6

अजिंक्य कांगारूंच्या भेदक माऱ्यासमोर उभा राहिला आणि टीम इंडियाचा डाव सावरला

3/6

यावेळी अजिंक्य रहाणेचे शतक 11 रन्सने हुकलं खरं, मात्र त्याने इतिहास रचलाय. 

4/6

या सामन्यात रहाणेने 69 रन्स करताच 5000 रन्सचा टप्पा देखील पूर्ण केलाय. 

5/6

याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरलाय. आतापर्यंत टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला यापूर्वी या फायनलमध्ये अर्धशतक झळकावता आलं नव्हतं. पण हा कारनामा अजिंक्यने करून दाखवलाय.

6/6

याशिवाय ओव्हल मैदानावर 2 मराठमोळ्या खेळाडूंनी शतकी भागिदारी केली. या दोघांनी 7 व्या विकेट्ससाठी 112 रन्सची पार्टनरशिप केली आहे.