26000 कोटींचा मालक... विराट, सचिन, धोनी, रोहितच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही त्याच्याकडे जास्त पैसा

World Richest Player: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेची बीसीसीआयचं नाव घेतलं जातं. मात्र बीसीसीआयची एकूण संपत्तीही फिकी वाटेल इतकी संपत्ती या खेळूकडे आहे. एवढंच काय भारतामधील सर्व आघाडीच्या क्रिकेटपटूंची संपत्ती एकत्र केली तरी ते या खेळाडूच्या आसपासही पोहचू शकत नाहीत. ही व्यक्ती आहे तरी कोण? आणि काय खेळतो ते पाहूयात..  

| Sep 04, 2024, 15:25 PM IST
1/13

richestplayer

सर्व भारतीय क्रिकेटपटू एकीकडे आणि हा एकीकडे अशी तुलना केली तरी तो अधिक श्रीमंत आहे. हा खेळाडू आहे तरी कोण आणि तो करतो काय? जाणून घेऊयात..

2/13

richestplayer

जगातील सर्वोत्तम खेळाडू कोण आहे याबद्दल अनेकदा वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. अर्थात सर्वकालीन सर्वोत्तम म्हणजेच ऑल टाइम ग्रेट खेळाडू कोण याबद्दल मतभेद असले तरी खेळांच्या इतिहासामध्ये सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वात जास्त पैसा कमवणारा खेळाडू कोण याबद्दल वाद होण्याची शक्यताच नाही कारण इथे आकडेच बोलतात.  

3/13

richestplayer

ज्या खेळाडूबद्दल आपण बोलतोय तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयपेक्षाही श्रीमंत आहे. बीसीसीआयची एकूण संपत्ती 16493 कोटी रुपये इतकी आहे. तर या खेळाडूकडील संपत्ती ही त्यापेक्षाही अधिक आहे.

4/13

richestplayer

या खेळाडूच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरुनच येतो की निवृत्तीच्या 20 वर्षानंतरही त्याच्या कमाईमध्ये कोणतीही घट झालेली नाही. आजही त्याचं नाव जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये आवर्जून घेतलं जातं. त्याच्या संपत्तीप्रमाणे चाहत्यांची संख्याही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे.   

5/13

richestplayer

विशेष म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी यासारख्या भारतामधील आघाडीच्या खेळाडूंची संपत्ती एकत्र केली तरी ते या खेळाडूच्या एकूण संपत्तीच्या आसपासही पोहचू शकत नाहीत. हा खेळाडू नेमका कोण आहे? त्याची कमाई किती? तो काय खेळतो हे पाहूयात...

6/13

richestplayer

क्रिकेटला अमेरिकेमध्ये लोकप्रिय करण्यासाठी ज्या प्रमाणे विराट कोहलीच्या नावाचा वापर 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप दरम्यान करण्यात आला तसाच या खेळाडूचा प्रभाव असून तो खेळत असलेला खेळ लोकप्रिय करण्यात त्याचं मोलाचं योगदान आहे. आज या खेळाला जी काही प्रसिद्धी मिळाली आहे ती त्याच्यामुळेच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  

7/13

richestplayer

भारतामध्ये फारचा प्रसिद्ध नसलेला मात्र अमेरिकेमध्ये क्रिकेटपेक्षाही अधिक लोकप्रिय असणारा खेळ म्हणजे बास्केटबॉल! हा खेळ खेळणारा एक माजी बास्केटबॉलपटू आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो. या खेळाडूचं नाव आहे मायकल जॉर्डन!

8/13

richestplayer

सध्या खेळातून निवृत्त झाल्यापासून एक उद्योजक म्हणून कार्यरत असलेल्या मायकल जॉर्डनची एकूण संपत्ती 3.2 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनामध्ये ही संत्ती 26000 कोटी रुपये इतकी होते.

9/13

richestplayer

बास्केटबॉल आणि एनबीएला अमेरिकेबरोबरच युरोपमध्ये लोकप्रिय करण्यामध्ये ममायकल जॉर्डनची मोलाची भूमिका होती. तो एनबीएचे एकूण 15 सिझन खेळला. सन 1984 ते 2003 दरम्यान तो एनबीएमध्ये सक्रीय होता. या काळात त्याने शिकागो बुल्सकडून खेळताना तब्बल 6 एनबीए चॅम्पियनशिप जिंकून दिल्या.  

10/13

richestplayer

26000 कोटी संपत्ती असलेल्या मायकल जॉर्डनने सक्रीय असताना 15 वर्षांच्या करिअरदरम्यान केवळ 94 मिलियन अमरिकी डॉलर्स म्हणजेच 788 कोटी रुपये कमवले होते. तो केवळ दोन सीझनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू होता. म्हणजेच 788 कोटी बाजूला केले तरी त्याने 25200 कोटींहून अधिकची कमाई खेळातून निवृत्त झाल्यानंतर केली आहे हे विशेष!  

11/13

richestplayer

ब्रॅण्ड एण्डोर्समेंटच्या माध्यमातून मायकल जॉर्डन बरीचशी कमाई करतो, असं स्पोर्टीकोने दिलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. गाटोरेड, 2 के गेम्स, फाइव्ह स्टार फ्रेगनन्सेज, अपर डेकसारख्या ब्रॅण्डबरोबर त्याचे करार आहेत. त्याच्या कमाईमध्ये नाईके या स्पोर्ट्स ब्रॅण्डचाही मोठा वाटा आहे.   

12/13

richestplayer

नाईकेबरोबरच्या करारानुसार मायकल जॉर्डनला वर्षाचे 2000 कोटी रुपये दिले जातात. केवळ ख्रिस्तियानो रोनाल्ड याबाबतीत त्याच्या पुढे आहे. नाईके रोनाल्डोला वर्षाला 2300 कोटी रुपये देते. 1984 पासून तो नाईकेबरोबर आहे.  

13/13

richestplayer

काही वर्षांपूर्वी मायकल जॉर्डनने एनबीएमधील शॉर्लेड हॉर्नेस्टमधील आपला वाटा विकला. त्यामधूनही त्याला मोठी रक्कम मिळाली. या विक्रीच्या माध्यमातून त्याने बक्कळ पैसा कमवल्यानेच त्याची संपत्ती आज 26000 कोटींहून अधिक आहे.