'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

Homi Vyarawalla: आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) आहे. आजचा दिवस हा फारच खास आहे. त्यातून आपल्यासाठी फोटोंचे महत्त्व किती वेगळं आहे हे काही सांगायला नकोच. आज या औचित्यानं आपण जाणून घेऊया ते म्हणजे भारताच्या पहिल्यावहिल्या महिला फोटो पत्रकाराबद्दल. तुम्हाला त्यांना मिळालेली पहिली Assignment कोणती होती माहितीये? 

| Aug 19, 2023, 13:13 PM IST

Homi Vyarawalla: आपले सर्व आनंदाचे, मस्तीचे, प्रेमाचे आणि सुख-दु:खाचे क्षण हे टिपले जावेत आणि सोबतच ते आपल्याकडे असावेत अशी ही मानवी इच्छा साकार झाली ही फोटोंमुळे. जेव्हा फोटो नव्हते तेव्हा लोकं आपल्याला आरश्यात टिपायचे अथवा चित्रकलेतून पाहायचे. तेव्हा आपल्या मनात आपली प्रतिमा या माध्यमातून तयार करणे फारच रोमांचक असेल नाही? आज आपण हीच प्रतिमा सोशल मीडियावर आणि सेल्फीतून, Iphone च्या कॅमेऱ्यातून पाहतो. त्यामुळे स्वत:कडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही फार वेगळा आहे. फोटोंनी आपलं आयुष्य पुरतं बदलून टाकलं आहे. आज दररोज स्मार्ट फोनमुळे हजार फोटो आपण टिपू शकतो. 

1/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

photos

आज जागतिक फोटोग्राफी डे आहे. त्यामुळे सध्या आपण सर्वच जणं आपले आवडते फोटो सोशल मीडियावर शेअर करत असूनच. सध्या तुम्ही पाहत आहेत ते म्हणजे होमी व्यारवाला यांचे हे फोटोज. (फोटो: बीबीसी)

2/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

marathi news

हे क्षण होमी व्यारवाला यांनी टिपलेले आहेत. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळानंतर फोटोग्राफी करायला सुरूवात केली होती. (फोटो: बीबीसी)

3/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

viral news

त्यांनी टिपलेले हे क्षण फारच अमुल्य आहेत. आज हे फोटो पाहणं आपल्यासाठी फारच दुर्मिळ आहे. यावेळी जाणून घेऊया होमी व्यारवाला यांच्याविषयी. (फोटो: बीबीसी)

4/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

homi vyarawalla world photography day

आज वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे. त्यामुळे या निमित्तानं जाणून घेऊया भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट होमी व्यारवाला यांच्याविषयी. (फोटो : सोशल मीडिया)

5/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

homi vyarawalla trending news

होमी व्यारवाला यांचा जन्म हा 9 डिसेंबर 1913 साली झाला होता. त्यांचा जन्म नवसारी गुजरात येथील मध्यमवर्गीय पारसी कुटुंबात झाला होता. (फोटो : विकीपीडिया)

6/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

homi vyarawalla marathi news

भारत स्वतंत्र झाल्यानंतर होमी यांनी लाल किल्लावर तिरंगा फिडकवल्याचा क्षण टिपला होता. (फोटो : होमग्राऊन)

7/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

homi vyarawalla photojournalist

त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टमधून फोटोग्राफीचे शिक्षण घेतले होते. त्यांचा नवरा मानेकशां व्यारवाला यांच्याकडून त्यांनी फोटोग्राफीचे धडे घेतले. (फोटो : सोशल मीडिया)

8/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

homi vyarawalla photos

1930 साली जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यांचे पहिले काम हे बॉम्बे क्रॉनिकलमध्ये प्रकाशित झाले होते. त्यासाठी त्यांना एक रूपये मिळाले होते. (फोटो : सोशल मीडिया)

9/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

homi vyarawalla news

'द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'मधून त्यांनी आपल्या कामाची सुरूवात केली होती. त्यांनी महात्मा गांधी, जवाहर लाल नेहरू, मोहम्मद अली जिन्ना, इंदिरा गांधी अशा अनेकांची छायाचित्र त्यांनी टिपली आहेत. (फोटो : झी न्यूज)

10/10

'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा

homi vyarawalla

2011 साली त्यांना पद्मविभूषण नं सन्मानित केले होते. 2017 साली त्यांना Google Doodle नं मानवंदना दिली होती. (फोटो : झी न्यूज)