जगातील सर्वात भारी Bodybuilder चा मृत्यू! रोज 2.5 किलो मटण, 7 वेळा जेवण; असा झाला दुर्देवी अंत

World's Most Monstrous Bodybuilder Death: त्याच्याकडे पाहिल्यानंतर धडकी भरल्यासारखं वाटायाचं. मात्र अंगाने इतका धिप्पाड असलेला माणूस अवघ्या 5 दिवसात मृत्यूच्या दाढेत ओढला गेला. नेमकं त्याच्याबरोबर घडलं काय जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Sep 14, 2024, 08:02 AM IST
1/11

 illiayefimchyk

जगभरामध्ये सध्या त्याच्या आकस्मिक मृत्यूची चर्चा आहे. नेमकं त्याच्याबरोबर घडलं काय आणि त्याचा मृत्यू कसा झाला, जाणून घेऊयात...

2/11

 illiayefimchyk

जगातील सर्वात आगडदांड बॉडीबिल्डर अशी ओळख असलेल्या इलिया येफिमचिकचा मृत्यू झाला आहे. तो मूळचा बेलारुसचा होता.  

3/11

 illiayefimchyk

वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी इलिया येफिमचिकचं निधन झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, इलिया येफिमचिकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.  

4/11

 illiayefimchyk

6 सप्टेंबर रोजी इलिया येफिमचिकला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान तो कोमात गेला. उपचार सुरु असतानाच उपचाराच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी इलिया येफिमचिकचं निधन झालं.   

5/11

 illiayefimchyk

इलिया येफिमचिकला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याची पत्नी अॅना हिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिका येईपर्यंत तिने त्याच्या छातीवर दाब देऊन हृदयाची क्रिया सुरळीत राहील असा प्रयत्न केला, असं 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. नंतर इलिया येफिमचिकला थेट हवाई रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आलं.  

6/11

 illiayefimchyk

"मी सतत प्रार्थनाच करत होते की इलिया येफिमचिक यामधून सुखरुप बाहेर पडावा," असं अॅनाने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. "मी रोज त्याच्या उशाशी बसून असायचे. मला आशा होती की त्याचं हृदय पुन्हा धडधडू लागेल. मात्र डॉक्टरांनी मला सांगितलं की तो ब्रेन डेड झाला आहे. त्याच्या मेंदूने प्रतिसाद देणं बंद केलं," असं इलिया येफिमचिकची पत्नी म्हणाली.   

7/11

 illiayefimchyk

"त्याच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांचे मी आभार मानते. या जगात त्याच्या निधनानंतर मी एकटी नाही हे सर्वांनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळे जाणवलं. अनेकांनी मला मदत करण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठी मी त्यांची आभारी आहे," असं इलिया येफिमचिकच्या पत्नीने त्याच्या मृत्यूनंतर जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.   

8/11

 illiayefimchyk

इलिया येफिमचिकने कधीच प्रोफेश्नल स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही. मात्र बेलारुसच्या या बॉडीबिल्डरचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स होते. इलिया येफिमचिक अनेकदा चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करायचा. हे व्हिडीओ पाहून तो मानवी शरीर क्षमतेची चाचणीच पाहत असल्यासारखं वाटायचं, असं चाहते म्हणायचे. त्याच्या चाहत्यांनी त्याला The Mutant असं टोपणनाव ठेवलं होतं.   

9/11

 illiayefimchyk

इलिया येफिमचिक हा दिवसातून सात वेळा जेवायचा. आपली शरीरयष्टी सुडैल ठेवण्यासाठी इलिया येफिमचिक दिवसाला 16,500 कॅलरीज असलेलं भोजन घ्यायचा.  

10/11

 illiayefimchyk

इलिया येफिमचिक रोज अडीच किलो मांस आणि सुशीचे 108 तुकडे खायचा. त्याचं वजन 154 किलो इतकं होतं. तो 6.1 फूट उंच होता. त्याची छाती 61 इंचांची आणि बायसेप्स 25 इंचाचे होते.   

11/11

 illiayefimchyk

शालेय वयात असताना इलिया येफिमचिक केवळ 70 किलोंचा होता. त्याला साध्या पुशअप्सही मारता येत नसतं. मात्र नंतर तो आरनॉल्ड आणि सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्यामुळे बॉडीबिल्डींगकडे गांभीर्याने पाहू लागला. या दोघांपासून प्रेरणा घेऊन त्याने बॉडीबिल्डींग सुरु केलं होतं. मात्र अशा कष्टाळून बॉडीबिल्डरचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. चेक प्रजासत्ताक, अमेरिका आणि दुबईमध्ये इलिया येफिमचिक वास्तव्यास होता.