जगातील सर्वात सुंदर महाराणी गायत्री देवी यांचे ब्युटी सिक्रेट, सौंदर्याकरिता घरगुती उपाय

Ancient Beauty : सौंदर्य हा महिलांचा दागिना आहे. साधेपणा टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण पूर्वीच्या काळात महिला घरगुती उपायांनी घ्यायच्या त्वचेची काळजी. 

भारत हे सौंदर्यशास्त्राचे प्रमुख स्थान आहे. आजही अनेक देशांमध्ये भारतातील सौंदर्याचे घरगुती उपाय वापरले जातात. पण हल्ली महिला सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी ब्युटी पार्लर किंवा मेकअपचा वापर करतात. पण या लेखातून आपण जगातील सर्वात सुंदर महाराणी असलेल्या गायत्री देवी यांच्या खास ब्युटी टिप्स पाहणार आहोत. 

1/7

पपई

World Beautiful Queen Maharani Gayatri Beauty Secrets Traditional Indian Beauty Home Remedies for Glowing Skin

पपईमध्ये एन्झाईम्स असतात जे त्वचेला एक्सफोलिएट आणि उजळ करण्यास मदत करतात. १/४ कप पिकलेली पपई मॅश करा आणि चेहऱ्याला लावा. कोमट पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. हे आठवड्यातून 2-3 वेळा पुन्हा करा.

2/7

मध

World Beautiful Queen Maharani Gayatri Beauty Secrets Traditional Indian Beauty Home Remedies for Glowing Skin

17 व्या शतकापासून लोकांनी मध वापरण्यास सुरुवात केली. जळलेल्या खुणांवर तुम्ही मध लावू शकता, कारण मधामध्ये अँटीसेप्टिक आणि बरे करण्याचे गुणधर्म असतात. जळजळीत मध नियमितपणे लावल्याने डाग लवकर निघून जातात.   

3/7

केशरचा वापर

World Beautiful Queen Maharani Gayatri Beauty Secrets Traditional Indian Beauty Home Remedies for Glowing Skin

महाराणी त्या काळात चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी केशरचा वापर करायच्या. एवढंच नव्हे तर या केशराच्या वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात. तसेच घोडीच्या दुधात केशर मिसळून महाराणी आंघोळ करत असतं.   

4/7

कडुलिंब

World Beautiful Queen Maharani Gayatri Beauty Secrets Traditional Indian Beauty Home Remedies for Glowing Skin

घनदाट केस सौंदर्यमध्ये भर घालतात यात शंका नाही. त्या काळात राण्यांचे केस चमकदार असायचे, कडुलिंबाची मदत घेत घनदाट केस केले जात असतं. तसेच निरोगी राहण्यासाठी केसांना कडुलिंबाच्या तेलाने मसाज करत असत.

5/7

बेसनाचा वापर

World Beautiful Queen Maharani Gayatri Beauty Secrets Traditional Indian Beauty Home Remedies for Glowing Skin

चेहऱ्याचं टॅनिंग कमी करण्यासाठी बेसनाचा वापर केला जात असे. आजही लहान मुलांना जन्मानंतर सुरुवातीला काही काळ बेसनच वापरले जाते. यामुळे बेसनचा वापर महाराणी देखील त्या काळात कर असतं. 

6/7

चंदनाची पेस्ट

World Beautiful Queen Maharani Gayatri Beauty Secrets Traditional Indian Beauty Home Remedies for Glowing Skin

अनेक पुस्तकांमध्ये महाराणी त्या काळात चंदनाचा वापर करत असा उल्लेख आहे. महाराणी चंदनाची पेस्ट चेहऱ्याला लावत असतं. यामुळे खूप चांगला ग्लो येत असे.   

7/7

तुळस

World Beautiful Queen Maharani Gayatri Beauty Secrets Traditional Indian Beauty Home Remedies for Glowing Skin

तुळस ही पूर्णतः गुणकारी आहे. जसे की, तुळशीची पाने शरीरासाठी महत्त्वाची ठरतात. तर तुळशीचा अर्क हा त्वचा तजेलदार करायला तसेच सुंदर त्वचेसाठी तुळस फायदेशीर ठरते.