दर दिवशी मिळतं कैक क्विंटल सोनं; हे ठिकाण आहे प्रत्यक्षातील KGF

Gold Mine: खरंच की काय.... ? जगाच्या पाठीवर असणाऱ्या या ठिकाणाविषयी माहितीये का?   

Jan 08, 2025, 15:14 PM IST

Gold Mine: सोन्याची खाण... हे विशेषण अनेकदा अनेक संदर्भांमध्ये वापरात आलं असेल. पण, प्रत्यक्षात कधी सोन्याची खाण पाहिलीय का?

1/7

सोनं

World America Nevada Gold Mine produced 19 lakh kg gold this place worlds real KGF

Gold Mine: सोन्याच्या खाणीतून सोनं कशा पद्धतीनं काढलं जातं याची झलक 'KGF' चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. पण, तुम्हाला माहितीये का, जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण कुठंय? चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या मोठ्या देशांमध्ये सोन्याच्या मोठ्या खाणी अस्तित्वात आहेत. पण, अमेरिकेतील नेवादा इथं एक अशी खाण आहे जिथं संपूर्ण अमेरिकेतील सोन्याचा 75 टक्के पुरवठा केला जातो. 

2/7

सोन्याची खाण

World America Nevada Gold Mine produced 19 lakh kg gold this place worlds real KGF

सोन्याच्या खाणीचा गड, अशी नेवादा इथं असणाऱ्या सोन्याचा खाणीची ओळख आहे. सोन्याच्या उत्पादनामध्ये नेवादाचं मोठं योगदान असून, जगभरात या खाणीची ओळख आहे. 19 व्या शतकामध्ये या खाणीचा शोध लागला होता. तेव्हापासूनच या खाणी आर्थिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

3/7

नेवादा

World America Nevada Gold Mine produced 19 lakh kg gold this place worlds real KGF

नेवादा इथं असणाऱ्या या सोन्याच्या खाणींमुळं स्थानिक अर्थसत्तेला प्रसिद्धीझोतात आणलं असून, नेवादातील या खाणींमध्ये  'कार्लिन ट्रेंड'चं नाव आवर्जून घेतलं जातं. 

4/7

कार्लिन ट्रेंड

World America Nevada Gold Mine produced 19 lakh kg gold this place worlds real KGF

जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींमध्ये ही खाण गणली जाते. कार्लिन ट्रेंडमध्ये माइक्रोस्कोपिक सोन्याचे कण सापडतात, ज्यांना 'कार्लिन-स्टाइल गोल्ड डिपॉजिट्स' म्हटलं जातं. 

5/7

सोन्याचे साठे

World America Nevada Gold Mine produced 19 lakh kg gold this place worlds real KGF

नेवादातील या कार्लिन ट्रेंडमधून आतापर्यंत 70 मिलियन औंस म्हणजेच (19 लाख किलोग्राम) पेक्षा जास्त प्रमाणातील सोन्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. या क्लिष्ट प्रक्रियेसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 

6/7

रोजगारनिर्मिती

World America Nevada Gold Mine produced 19 lakh kg gold this place worlds real KGF

नेवादा इथं असणाऱ्या सोन्याच्या खाणींमध्ये स्थानिक परिघातून मोठ्या संख्येनं रोजगारनिर्मिती झाली असून, खाणीत काम करणाऱ्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधारही मिळाला आहे. 

7/7

खनिजसंपत्ती

World America Nevada Gold Mine produced 19 lakh kg gold this place worlds real KGF

नेवादा येथील सोन्याच्या खाणींचा इतिहास फक्त येथील खनिजसंपत्तीपुरताच सीमित नसून, इतरही अनेक दृष्टीकोनातून त्याचं महत्त्वं आहे.