'तुम्ही रेखासोबत काम करणार का?', ब्रेकअपनंतर या प्रश्नांवर बिग बी काय म्हणाले?

Amitabh Bachchan Rekha : बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाणी आणि ब्रेकअपचे किस्से आहेत. त्यातील प्रसिद्ध ब्रेकअप स्टोरी ही अमिताभ आणि रेखा, सलमान आणि ऐश्वर्या यांची आहे.   

Aug 05, 2023, 13:38 PM IST

Bollywood Kissa : गंमतीशीर गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि आजही चर्चेली जाणारी लव्ह स्टोरी आणि ब्रेकअपची कहाणीमध्ये दोन व्यक्ती आज एकाच घरात राहतात. एक आहे अमिताभ रेखा यांची लव्ह स्टोरी दुसरी सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या आणि सलमान यांची. 

1/9

अमिताभ आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायला खूप उत्सुक असतात. आज आम्ही असाच एक किस्सा सांगणार आहोत. 

2/9

बॉलिवूडमधील अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींची नावं जोडल्या गेली. काहींनी आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. तर काहींच्या प्रेमाबद्दलचे किस्से आजही चर्चेली जातात. त्यातील एक अधुरी प्रेमकहाणी आहे ती बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन आणि सदाबहार अभिनेत्री रेखा यांची

3/9

खरं तर बिग बी आणि रेखा यांची प्रेम कहाणी कधीही उघडपणे बोलली गेली नाही. पण बॉलिवूडमध्ये या दोघांची जवळीकबद्द कायम बोललं गेलं.   

4/9

दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. परद्यावरील रोमान्स प्रत्यक्षात उतरावा असं चाहत्यांना कायम वाटायचं. 

5/9

असं म्हणतात या दोघांमधील जवळीक प्रेमात बदलली होती. या दोघांचं प्रेमप्रकरणी तब्बल 5 वर्षे सुरु होतं. पण अमिताभ यांचं लग्न झालं होतं. 

6/9

जया बच्चन यांना त्यांचा या अफेयरची कल्पना मिळाली आणि त्यानंतर या दोघांनी 1981 पासून अंतर ठेवायला सुरु केली. ते अंतर आजपर्यंत तसंच आहे. 

7/9

अमिताभ बच्चन आणि रेखा गेल्या चाळीस वर्षांत एकमेकांसोबत दिसले नाहीत. कधी कुठल्या पार्टी किंवा पुरस्कार सोहळ्यात ते भेटले तरी एकमेकांकडे बघत नाहीत. 

8/9

जेव्हा या दोघांमध्ये ब्रेकअप झालं त्यानंतर एका पत्रकाराने अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला होता. त्या म्हणाला की, चांगली कथा असेल तरीही तुम्ही दोघ पुन्हा एकत्र काम करणार नाही का?

9/9

एकदा बरखा दत्तनेही बिग बींना हाच प्रश्न विचारला होता, तुम्ही पुन्हा रेखासोबत काम करणार नाही का? यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, चांगली कथा आली तर नक्कीच काम करु. आजपर्यंत एकही चांगली कथा आली नाही. त्यामुळे ते पुन्हा एकत्र परद्यावर दिसले नाहीत.