रेखा कायम साडीच का नेसतात? कारण फारच इंटरेस्टिंग
Rekha Saree Look : अभिनेत्री रेखा म्हणजे बॉलिवूडला पडलेलं सुंदर असं स्वप्न... वयाच्या 68व्या वर्षी रेखा आपल्या निखळ सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करतात. रेखा कायम साडीच का दिसतात याचं उत्तर उघड झालं आहे.
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा वयाच्या 68 व्या वर्षीही चाहत्यांना घायाळ करत आहेत. रेखा आता सिनेमांमध्ये दिसत नाहीत मात्र अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रेखा दहजेरी लावत असते. अनेकदा पापाराझीच्या कॅमेऱ्यात रेखा कैद होतात तर कधी अवॉर्ड फंक्शनला रेखा हजेरी लावतात. असं सगळं असताना रेखा कायम साडीच दिसतात हा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. रेखा गेल्या अनेक वर्षांपासून आपलं सौंदर्य आणि फॅशन स्टाईल कायम ठेवली आहे. कोणत्याही कार्यक्रमांमध्ये त्यांचा साडी लूक सगळ्यांपेक्षा हटके आणि भारी असतो.
रेखा पार्टी असो वा अवॉर्ड फंक्शन सगळीकडे एका ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. याला कारण एकच ती म्हणजे साडी... साडी, शोभेसे दागिने आणि केसात गजरा... इतका साधा आणि सुंदर असा रेखा यांचा लूक असतो. पण रेखा साडी नेसण्यामागचं कारण काय.. कायमच या पारंपरिक पोशाखात रेखा का असतात आज हे जाणून घेऊया.