कोजागिरी दुधातच का पाहतात चंद्र? वाचा रंजक कारण

शरद पौर्णिमा हा हिंदू भक्तांसाठी सर्वात शुभ दिवसांपैकी एकआहे. शरद पौर्णिमा हा वर्षातील एकमेव असा दिवस आहे जेव्हा चंद्र सर्व सोळा कलाशांसह बाहेर येतो. हिंदू धर्मात, प्रत्येक कला वेगळ्या मानवी स्वभावाशी जोडलेला आहे आणि असे मानले जाते की भगवान कृष्ण हे सर्व सोळा कलांसह जन्मले होते कारण ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. शरद पौर्णिमेला चंद्राची पूजा करतात. शरद पौर्णिमेला दूध चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवण्याची परंपरा आहे. तर कोजागिरीला दुधातच का पाहतात चंद्र? या माघे एक रंजक कारण आहे... 

Oct 27, 2023, 12:35 PM IST
1/6

दसऱ्याच्या सणानंतर चार दिवसांनी पौर्णिमेची रात्र असते, ज्याला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात, हे शरद ऋतूच्या सुरवातीचे प्रतीक आहे.

2/6

महाराष्ट्र आणि बंगालमध्ये  या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. असे मानले जाते की या पौर्णिमेच्या रात्री  देवी लक्ष्मी तिच्या भक्तांना भेट देते आणि उत्सव साजरा करत रात्रभर जागे राहणाऱ्यांना आशीर्वाद देते. म्हणून या सणाला कोजागरी पौर्णिमा असे बोलतात

3/6

या दिवशी दूध पिणे महत्त्वाचे असते :

महाराष्ट्रात मसाला दूध बनवण्याची परंपरा आहे, तर हे साखर, दूध, काजू, बदाम, पिस्ता, वेलची, केशर आणि जायफळ टाकून बनवले जाते.  हे उघड्यावर, चंद्रप्रकाशाखाली दोन तास ठेवून नंतर उत्सवासाठी जमलेल्या सर्वांना दिले जाते. मसाला दुधाऐवजी काहीजण खीरही बनवतात.

4/6

विज्ञान काय म्हणते :

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो असे मानले जात असल्याने, या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असतात. 

5/6

गोड दूध असलेले भांडे चंद्रप्रकाशात ठेवून नंतर सर्वांना ते दूध वाटतात.

6/6

या मागचं आयुर्वेदिक कारण :

आयुर्वेदानुसार पावसाळ्याच्या शेवटी 'पित्त' किंवा आम्लपित्त शरीरात जास्त प्रमाणात असतं. या कारणामुळे पित्ताला उपाय म्हणून किंवा ते संतुलित करण्यासाठी थंड पदार्थ  खाल्ले जातात. थंड दूध आणि तांदळाचे सेवन  पित्तासाठी एक चांगला उपाय आहे असेही मानले जाते.