IND vs ENG: उर्वरित टेस्टच्या टीम घोषणेसाठी का होतोय उशीर? नेमकं कुठे अडतंय घोडं?

India vs England: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमध्ये 2 सामने खेळवले गेले असून उर्वरित 3 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा होणं बाकी आहे. 

Surabhi Jagdish | Feb 10, 2024, 09:06 AM IST
1/7

इंग्लंडविरूद्धची तिसरी सिरीज 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र या टेस्ट सामन्यासाठी अजून  टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. 

2/7

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाची घोषणा होणार असा दावा करण्यात येत होता, मात्र अद्याप याबाबत काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

3/7

टीम इंडियाची घोषणा करण्यात इतका उशीर का होतोय, असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात आहे. 

4/7

भारतीय निवड समितीने अद्याप शेवटच्या तीन टेस्टसाठी संघाची घोषणा केलेली नाही आणि जडेजाच्या फिटनेसबाबत स्पष्टता आल्यानंतरच याबाबत घोषणा होईल अशी शक्यता आहे. 

5/7

जडेजाला बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. विशाखापट्टणम टेस्टमध्ये तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर राहुलही दुखापतीमुळे बाहेर आहे.

6/7

तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय खेळाडू 11 फेब्रुवारीला राजकोटला पोहोचणार आहेत. तर इंग्लंडची टीम एका दिवसानंतर राजकोट गाठेल.

7/7

तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय खेळाडू 11 फेब्रुवारीला राजकोटला पोहोचणार आहेत. तर इंग्लंडची टीम एका दिवसानंतर राजकोट गाठेल.