PHOTO : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पांढरा रंग का दिला जातो? हे फक्त संकेत आहे की विज्ञान?

Why White Paint on Tree: रस्त्यावरुन प्रवास करताना तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेली झाडं कधी निरखून पाहिली आहात का? या झाडांना हमखास पांढरा रंग मारलेला असतो. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? हे कसलं संकेत आहे की यामागे काही विज्ञान आहे?

Mar 12, 2024, 15:47 PM IST
1/7

वैज्ञानिक कारणं

या झाडांना विनाकारण पांढरा रंग दिला जात नाही, यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत. ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती हवंच. 

2/7

झाडांचं आयुष्य

या झाडांना चुना वापरला जातो यामागे कारण असं आहे की, यामुळे झाडांचं आयुष्य वाढलं जातं. झाडांना चुना लावल्याने दीमक आणि इतर प्रकारचे कीटकांपासून त्यांचं संरक्षण होतं. 

3/7

झाडाचे खोड मजबूत राहण्यास मदत मिळते

तज्ज्ञांच्या मते झाडाला चुना लावल्यास झाडाच्या सालीला तडा जात नाही म्हणून झाडाचे खोड मजबूत राहण्यास मदत मिळते.

4/7

त्याशिवाय रात्रीच्या अंधारात खास करुन जिथे पथदिवे नसतात तिथे वाहनचालकांना रस्ता समजावा म्हणून ही तर्तुत करण्यात येते,

5/7

सूर्यप्रकाशापासून बचाव

झाडांना खूप तीव्र सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी चुना हा झाडांना लावला जातो. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते त्याच्या पांढऱ्या रंगामुळे झाडाच्या खोडाचे कमीत कमी नुकसान होतं. 

6/7

वनविभागाची मालमत्ता

याशिवाय अजून एक कारण म्हणजे ही पांढऱ्या रंगाची झाडं वनविभागाची मालमत्ता आहे, असं संकेत त्यातून दिला जातो. अशा परिस्थितीत कोणताही सामान्य माणसाने ही झाडे तोडली किंवा नष्ट केल्यास कारवाई होती. 

7/7

काही राज्यांमध्ये झाडांना पांढऱ्या रंगाऐवजी लाल आणि निळा रंगही देण्यात येतो. वनविभागाकडून ज्या झाडांची मोजणी झाली आहे, त्या झाडांना हे रंग दिले जातात.