सकाळच्या कोवळ्या उन्हात की दुपारी? Vitamin D मिळवण्याची योग्य वेळ कोणती?

हिवाळा सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्यात आता आपण सगळेच हिवाळ्याची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहोत कारण गरमीमुळे आपल्याला होणारा त्रास हा सहण शक्तीपेक्षा जास्त आहे. मग आता एकदा थंडी सुरु झाली की आपल्याला ऊन्हाचे महत्त्व कळते. कारण तेव्हा थंडी इतकी असते की आपल्याला थोडं तरी ऊन हे हवंच. मग व्हिटामिन डी मिळवण्यासाठी योग्य वेळ कोणती? असा प्रश्न देखील अनेकांना असतो. चला तर जाणून घेऊ या सकाळचे ऊन कधी घ्यावे? यातून आपल्या आरोग्याला काय फायदा होईल? 

Oct 22, 2023, 20:50 PM IST
1/7

सकाळची योग्य वेळ

BestTimeForVitaminD

तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाश घेऊ शकता. कारण यावेळी व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. 

2/7

संध्याकाळची वेळ

BestTimeForVitaminD

संध्याकाळी सूर्यप्रकाशात उभं राहुन तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळवायचं असेल तर सूर्यास्त होण्याच्या काही वेळ आधी तुम्ही उन्हातून व्हिटामिन डी मिळवू शकता. 

3/7

उन्हात राहण्याचे काय आहेत फायदे?

BestTimeForVitaminD

व्हिटामिन डीसोबतच आपली हाड मजबुत होण्यास मदत होते. त्याशिवाय तुम्हील खूप ऊर्जा देखील मिळते.

4/7

शांत झोप

BestTimeForVitaminD

सूर्यप्रकाशात तुम्ही थोडा वेळ जरी थांबलात तरी तुम्हाला छान आणि गाढ झोप येण्यास मदत होते. मेलाटोनिन नावाच्या हार्मोनमुळे आपल्याला शांत झोप लागते. 

5/7

अनेकांना माहिती नाही फायदे

BestTimeForVitaminD

सूर्यप्रकाशात राहण्याचे अनेक फायदे कोणाला माहित नाही त्यामुळे आता तुम्हाला हे फायदे कळाल्यानंतर इतरांसोबत देखील नक्कीच शेअर करा. जेणेकरून सगळ्यांच्याच आरोग्याला फायदा होईल. 

6/7

UVA

BestTimeForVitaminD

सूर्यप्रकाशामुळे शरीराला UVA प्रदान होतात. त्यामुळे शरिरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो. इतकंच नाही तर रक्तातील ग्लुकोजची पातळीही सुधारते. 

7/7

BestTimeForVitaminD

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)