पहिला वर्ल्ड कप जिंकला तेव्हा टीम इंडियाला देण्यासाठी पैसेच नव्हते! लता मंगेशकरांनी कशी केली मदत?

T-20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ आज मायदेशी परतला आहे. चार्टर्ड फ्लाइटने सकाळी 6 वाजता टीम दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर पोहोचली. यावेळी संध्याकाळी मुंबईतील नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टीमची विजयी परेड होणार आहे. यानंतर बीसीसीआय टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे.

| Jul 04, 2024, 13:06 PM IST
1/7

यापूर्वी टीम इंडियाने 1983, 2007, 2011 साली वर्ल्डकप जिंकला होता. मात्र एक काळ असा होता की, 1983 च्या विश्वविजेत्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाकडे पैसे नव्हते.   

2/7

या काळात प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना पुढाकार घ्यावा लागला होता. त्यावेळी लतादीदींनी संगीत कार्यक्रम करून टीम इंडियासाठी निधी उभारला आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक लाख रुपये मिळाले.

3/7

1983 चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयकडे खेळाडूंना देण्यासाठी पैसे नव्हते. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयची आर्थिक स्थिती त्यावेळी अत्यंत बिकट होती. 

4/7

यावेळी टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये लता मंगेशकर यांचं कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. 

5/7

त्या काळी लता मंगेशकर यांची ही मैफल प्रचंड गाजली. या कॉन्सर्टच्या माध्यमातून 20 लाख रुपये कमावले गेले. नंतर टीम इंडियातील सर्व सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

6/7

या कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली होती. पण 'भारत विश्व विजेता' या गाण्याला खूप लोकांची खूप पसंती मिळाली. या गाण्याचं संगीत लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. 

7/7

या कॉन्सर्टसाठी लता मंगेशकर यांनी बीसीसीआयकडून कोणतीही फी घेतली नव्हती. लता मंगेशकर यांचं हे योगदान बीसीसीआय आणि तत्कालीन खेळाडूंच्या नेहमी लक्षात राहील.