Parliament House : नव्या इमारतीच्या उद्घाटनानंतर जुन्या संसद भवनाचे काय होणार?

New Parliament House : अडीच वर्षांच्या बांधकामानंतर देशातील नवीन संसद भवन तयार झाले आहे. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. यावरुन आता गोंधळ सुरु झालाय. जुने संसद भवन असताना नव्या इमारतीचे काम काय असा सवाल विरोधकांकडून होत आहे.

May 25, 2023, 18:12 PM IST
1/8

modi at Parliament House

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन होणार असून, त्यावरून गदारोळ झाला आहे. पण नवीन संसद भवन कधी सुरु कधी होणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. दुसरीकडे जुन्या म्हणजेच सध्याच्या संसद भवनाचे काय होणार? असाही प्रश्न विचारला जात आहे.

2/8

Repair of Parliament House

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मार्च 2021 मध्ये राज्यसभेत सांगितले होते की, नवीन संसद भवन तयार झाल्यानंतर, सध्याच्या इमारतीची दुरुस्ती करावी लागेल.   

3/8

old Parliament House use

जुन्या इमारतीचा पर्यायी वापर करण्यात यावा. मात्र, त्याचा वापर कशासाठी केला जावा, याचा कोणताही सर्वसमावेशक विचार करण्यात आलेला नाही, असेही मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले होते.

4/8

old parliament building will not be demolished

सरकारच्या म्हणण्यानुसार जुने संसद भवन पाडले जाणार नाही. ही देशाची ऐतिहासिक संपत्ती असल्याने त्याचे संरक्षण केले जाणार आहे. नवीन इमारतीसह संसदीय कामकाजासाठी याचा वापरता येईल अशा पद्धतीने इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.  

5/8

New Parliament House

नवीन संसद भवनाचे बांधकाम आणि विद्यमान संसद भवनाचे नूतनीकरण हा 'सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पा'चा भाग आहे. या प्रकल्पाशी संबंधित वेबसाइटनुसार, सेंट्रल व्हिस्टामध्ये असलेल्या कोणत्याही ऐतिहासिक इमारती (इंडिया गेट, संसद, नॉर्थ आणि साउथ ब्लॉक, नॅशनल आर्काइव्हज किंवा इतर कोणतेही) पाडल्या जाणार नाहीत.

6/8

Parliament House upgrade

या इमारतींना अपग्रेड करण्याची गरज आहे. वारसा संवर्धन मानकांनुसार त्यांच्यासाठी आवश्यक बांधकामे केली जातील आणि त्यांच्या पुढील वापरासाठी त्यांचे नूतनीकरण केले जाईल. नवीन संसद भवन आणि पुनर्निर्मित संसद भवन यांचा संयुक्तपणे वापर सध्याच्या संसद भवनात असलेल्या सर्व सुविधांसाठी केला जाईल, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे

7/8

Parliament House work load

संसदेच्या वाढत्या कामामुळे नवीन इमारतीची गरज भासू लागली होती, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन इमारत तयार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे.

8/8

Parliament House safty

सध्याचे संसद भवन ब्रिटिश काळात बांधले गेले होते, जे सुमारे 100वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम 1921 मध्ये सुरू झाले आणि 1927 मध्ये पूर्ण झाले. त्यात आधुनिक सुविधांची व्यवस्था नाही. (सर्व फोटो - PTI)