जर कोणी 2000 च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला तर तक्रार कुठे करायची? जाणून घ्या RBI चे सर्व नियम

RBI Rules over Exchange of 2000 Rs Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा चलनातून मागे घेण्यात येत असल्या तरी त्या वैध असतील आणि त्यांचा विधिसंमत चलन म्हणून दर्जा कायम असेल असं स्पष्ट केलं आहे. पण जर एखाद्या बँकेने 2000 रुपयांची नोट घेण्यास नकार दिला तर काय करावं? समजून घ्या RBI चा नियम....  

| May 23, 2023, 18:44 PM IST

RBI Rules over Exchange of 2000 Rs Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा चलनातून मागे घेण्यात येत असल्या तरी त्या वैध असतील आणि त्यांचा विधिसंमत चलन म्हणून दर्जा कायम असेल असं स्पष्ट केलं आहे. पण जर एखाद्या बँक, दुकानदार, व्यापाऱ्याने 2000 रुपयांची नोट घेण्यास नकार दिला तर काय करावं? समजून घ्या RBI चा नियम....

 

1/8

RBI Rules over Exchange of 2000 Rs Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा चलनातून मागे घेण्यात येत असल्या तरी त्या वैध असतील आणि त्यांचा विधिसंमत चलन म्हणून दर्जा कायम असेल असं स्पष्ट केलं आहे. पण जर एखाद्या बँक, दुकानदार, व्यापाऱ्याने 2000 रुपयांची नोट घेण्यास नकार दिला तर काय करावं? समजून घ्या RBI चा नियम....  

2/8

2000 च्या नोटा बदलण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी लोक बँकेच्या बाहेर रांगा लागत आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलल्या जाऊ शकतात असं आरबीआयने स्पष्ट केलं. याशिवाय या नोटा व्यवहारातही वापरल्या जाऊ शकतात असंही सांगितलं आहे. त्यामुळे जर कोणी या नोटा घेण्यास नकार दिला तर तुम्ही तक्रार दाखल करु शकता.   

3/8

2000 च्या नोटांसंबंधी निर्णय जाहीर झाल्यापासून सर्वात जास्त पेट्रोल पंपांवर गर्दी होत आहे. लोक पेट्रोल पंपांवर 2000 च्या नोटेचा वापर करत आहेत. यामुळे सुट्ट्या पैशांची समस्या निर्माण होत आहे. पण अनेक ठिकाणी पेट्रोलपंप चालक आणि दुकानदार नोटा स्विकारत नसल्याचं समोर येत आहे.    

4/8

RBI च्या नियमानुसार, जर एखादी बँक 2000 रुपयांची नोट स्वीकारण्यास नकार देत असेल तर तुम्ही सर्वात आधी संबंधित बँकेच्या मॅनेजरकडे तक्रार करु शकता. तसंच प्रत्येक बँकत एक तक्रार पुस्तक असतं, जिथे तुम्ही रिपोर्ट करु शकता. बँकेला तुम्हाला 30 दिवसांच्या आत उत्तर द्यावं लागेल. जर असं झालं नाही, किंवा तुम्ही बँकेच्या उत्तरावर समाधानी नसाल तर रिझर्व्ह बँकेची वेबसाईट cms.rbi.org.in वर जाऊन तक्रार करु शकता.   

5/8

ग्राहक आरबीआयच्या इंटिग्रेटेड लोकपाल योजनेअंतर्गत तक्रार दाखल करु शकतात. इंटिग्रेटेड लोकपाल योजना सेवेशी संबंधित तक्रारीची तात्काळ दखल घेत तोडगा काढण्यासाठी आहे. ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे.   

6/8

जर एखादा दुकानदार 2000 ची नोट स्विकारत नसेल तर तुम्ही पुराव्यासह RBI कडे तक्रार करु शकता. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दुकानदार नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही असं स्पष्ट केलं आहे. कारण नोट चलनातून बाद करण्यात आलेली नाही.   

7/8

RBI ने सांगितल्यानुसार, ज्यांच्याकडे 2000 ची नोटी आहे ते 23 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान देशातील कोणत्याही बँकेत जाऊन ती बदलू शकतात. एकावेळी 20 हजारापर्यंतची रक्कम म्हणजे 2000 च्या 10 नोटा बदलून दिल्या जातील. यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची किंवा ओळखपत्र दाखवण्याची गरज नाही.   

8/8

तसंच बँक खात्यात 2 हजाराच्या नोटा जमा करण्यासंबंधी कोणतीही मर्यादा नाही. पण यासाठी बँक डिपॉझिटच्या नियमांचं पालन करावं लागेल. याशिवाय बिझनेस कॉरेस्पॉन्डेंट सेंटरमध्ये जाऊनही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. पण येथे फक्त 4000 ची मर्यादा आहे.