Independence Day : पाकिस्तानच्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल काय लिहिलंय? भारतापासून वेगळा शिकवला जातोय इतिहास

Pakistan History of Independence :  पाकिस्तान आणि भारताला एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले, दोन्ही देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाले. पण स्वातंत्र्याच्या इतिहासाबाबत दोन्ही देशांमधील शाळांमध्ये वेगवेगळा इतिहास शिकवला जातो. 

| Aug 14, 2024, 17:12 PM IST
1/6

भारत आणि पाकिस्तान आपापल्या पद्धतीने शाळेतील मुलांना इतिहास शिकवत आहेत. दोन्ही पुस्तकांमध्ये स्वातंत्र्याच्या इतिहासाबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य इतिहास कसा शिकवला जातो ते पाहूयात

2/6

1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. 15 ऑगस्टला दोन्ही देश स्वतंत्र झाले. खरे पण 14-15 ऑगस्टच्या रात्री व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये सत्ता हस्तांतरित केली. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असले तरी दोन्ही देशांमध्ये अनेक प्रसंगी तणाव निर्माण झाला असून युद्धेही झाली आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याबद्दल काय शिकवले हे पाहणे औत्सुकाचे आहे. 

3/6

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीचा उल्लेख दोन्ही देशांच्या शालेय पुस्तकांमध्ये वाचायला मिळतो. भारतातील एनसीईआरटी पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, मोहम्मद अली जिना यांच्यासह मुस्लिम नेते फाळणीच्या विरोधात होते. तर पाकिस्तानच्या पंजाब बोर्डाच्या चौथ्या वर्गाच्या उर्दू माध्यमाच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की, स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांना स्वतःचे सरकार हवं होतं. जेणेकरून ते इस्लामिक कायद्यानुसार जीवन जगू शकतील. पण मुस्लिमांना माहित होते की भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, ते त्यांचा कायदा लागू करतील. ज्यामध्ये मुस्लिमांसोबत भेदभाव करण्यात आला होता.  

4/6

पाकिस्तानमधील आठवीच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात असं प्रकरण आहे जे म्हणजे 'ब्रिटिश अवेकनिंग इन इंडिया'. त्यात म्हटलंय की, स्वातंत्र्य चळवळीदरम्यान हिंदू राष्ट्राची मागणी करणारे अनेक भारतीय होते. हिंदूंच्या एका गटाने स्वराज चळवळ सुरू केल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय. ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीला विरोध केला. काँग्रेस पक्ष देशाचा आवाज बनू शकला नाही आणि हिंदू पक्ष म्हणून उदयास आला.   

5/6

भारतातील एनसीईआरटीच्या पुस्तकात असं म्हटलंय की, फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये एक प्रकारचे गृहयुद्ध सुरू झाले. तर पाकिस्तानच्या लाहोर बोर्डाच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात असा दावा केल्या की, जेव्हा गैर-मुस्लिम पाकिस्तान सोडत होते तेव्हा पाकिस्तानी मुस्लिमांनी त्यांना मदत केली. भारतातून पाकिस्तानात आलेल्या मुस्लिमांना लुटून हल्ले करण्यात आले, असं लिहिलंय. 

6/6

पाकिस्तानमधील 9 वी वर्गाच्या पुस्तकात 'भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका' या विषयावर एक धडा आहे. काँग्रेसचा कारभार खराब असल्याचे सांगण्यात आलंय. या कालखंडाचे राजकीय भ्रष्टाचाराचे वर्णन करून त्यांनी काँग्रेसच्या मनमानीबद्दल लिहिलंय.