iPhone 16 लाँच होताच iPhone 14, iPhone 15 झाले स्वस्त; जाणून घ्या काय आहेत नव्या किंमती

Apple ने iPhone 16 सीरिजची घोषणा करताच iPhone 14, iPhone 15 च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. जेव्हा कधी iPhone चं नवं मॉडेल लाँच होतं तेव्हा जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत घसरण होत असते.   

| Sep 10, 2024, 14:08 PM IST

Apple ने iPhone 16 सीरिजची घोषणा करताच iPhone 14, iPhone 15 च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. जेव्हा कधी iPhone चं नवं मॉडेल लाँच होतं तेव्हा जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत घसरण होत असते. 

 

1/7

Apple ने iPhone 14 आणि iPhone 15 मॉडेल्सच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. कंपनीने iPhone 16 सीरिजची घोषणा करताच ही कपात करण्यात आली आहे.   

2/7

जवळपास प्रत्येक वर्षी iPhone चं नवं मॉडेल लाँच होतात जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत घसरण होत असते. त्याचप्रमाणे यावर्षीही iPhone 16 सीरिज लाँच होताच जुने मॉडेल्स स्वस्त झाले आहेत.   

3/7

काय आहेत नव्या किंमती

काय आहेत नव्या किंमती

iPhone 15 च्या विविध मॉडेल्सवर किमतीतील कपातीचा परिणाम झाला आहे. स्टँडर्ड iPhone 15 ची किंमत आता 69 हजार 900 रुपयांपासून सुरू होत आहे. आधी ही किंमत 79 हजार 900 रुपये होती. दुसरीकडे, iPhone 15 Plus मध्येही अशीच कपात दिसत आहे. iPhone 15 Plus आता तुम्ही 79 हजार 900 रुपयांत खरेदी करु शकता. आधी याची किंमत 89 हजार 900 रुपये होती.

4/7

iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या किंमतीतही मोठी घसरण झाली आहे. iPhone 14 आता 59 हजार 900 रुपयांत उपलब्ध आहे. iPhone 14 ची किंमत तब्बल 10 हजारांनी कमी झाली आहे. iPhone 14 Plus ही स्वस्त झाला असून, आता तुम्ही तो फक्त 69 हजार 900 रुपयांत खरेदी करु शकता.   

5/7

या नव्या किंमती तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. अ‍ॅप्पल स्टोअर ऑनलाइनसह अ‍ॅप्पल स्टोअर लोकेशन्स आणि भागीदार रिटेल आउटलेट्ससह भारतातील सर्व अधिकृत अ‍ॅप्पल पुनर्विक्रेत्यांसाठी नवीन किमती लागू आहेत.  

6/7

आगामी सणासुदींच्या पार्श्वभूमीवर ग्राहक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किमतीत आणखी घट होण्याची अपेक्षा करू शकतात. एक्स्चेंज ऑफर, बँक सवलत आणि अशाच बऱ्याच सुविधांमुळे iPhone 14 आणि iPhone 15 सीरिजच्या किंमती आणखी खाली येतील.  

7/7

नेहमीप्रमाणे, Apple ने iPhone 16 Pro मॉडेल्स  लाँच केल्यानंतर iPhone 15 Pro मॉडेल्स बंद केले आहेत.