Mahakumbh 2025 : महाकुंभला जाण्याचा योग नाही; घरीच करा 'हे' काम, गंगा स्नानाचा मिळेल आशिर्वाद
प्रयागराज येथे महाकुंभ 2025 ला सुरुवात झाली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. पण अनेक लोकांना आजही महाकुंभला जाण्याचा योग आलेला नाही. त्यांनी राहत्या घरी कराव्यात 'या' खास गोष्टी.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ 2025 चा शुभारंभ झाला आहे. जेथे भव्य आणि पवित्र महाकुंभाच्या मेळा याचं आयोजन केलं आहे. धार्मिक मान्यतानुसार, कुंभमेळ्यात स्नान केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. हिंदू पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये 12 वर्षे संघर्ष झाला. या काळात, अमृताच्या भांड्यातून काही थेंब चार ठिकाणी पडले - प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो.