घनश्याम दराडे काय करतो? कितवीपर्यंत शिकलाय?

बिग बॉस मराठीमध्ये धुमाकूळ घालणारा महाराष्ट्राचा छोटा पुढारी काय करतो? कितवीपर्यंत शिकलाय? वाचा सविस्तर

| Aug 22, 2024, 19:23 PM IST
1/6

बिग बॉस मराठी

महाराष्ट्राचा लाडका आणि सुप्रसिद्ध असलेला छोटा पुढारी घनश्याम दराडे हा सध्या बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाला असून तो जबरदस्त खेळ खेळत आहे.   

2/6

शाब्दिक फटकारे

आठवीत शिकत असल्यापासूनच तो वीज, पाणी, शेती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ अशा अनेक विषयांवर शाब्दिक फटकारे करत सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. 

3/6

पदवीधर शिक्षण

छोटा पुढारी हा लहान मुलांसारखा दिसत असला तरी तो सध्या 22 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे छोटा पुढारीने पदवीधर शिक्षण घेतले आहे. 

4/6

रोखठोक मत

छोटा पुढारीचा अंदाज आणि बोलण्याची स्टाइल ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राजकीय नेत्यांसारखे बोलणे आणि रोखठोक आपलं मत मांडने यामुळे तो नेहमी चर्चेत असतो.  

5/6

शेतीची आवड

घनश्याम दराडे हा शिक्षणासोबतच शेती देखील करतो. नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न तो मांडत असतो. धनश्यामला वाचनाची देखील खूप आवड आहे. तो सतत जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवून असतो.

6/6

चाहता वर्ग

घनश्याम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्याचे शाब्दिक पंच देखील खूप व्हायरल होत असतात.