ISRO च्या Chandrayaan-3 मोहिमेसाठी किती खर्च झाला माहितीये का?

Cost Of ISRO's Chandrayaan 3 Mission: 2008 मध्ये चंद्रयान-1 आकाशात झेपावलं होतं. त्यानंतर चंद्रयान-2 मोहीमेला काही प्रमाणात यश आलं. आता 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान-3 आकाशात झेपावणार असून त्याची सर्व पूर्वतयारी झाली आहे. श्रीहरीकोटाच्या लॉन्चिंग पॅड 2 वरील तयारीचे फोटो समोर आले आहेत. मात्र या चंद्रयान-3 मोहीमेचा नेमका खर्च किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का? याचसंदर्भात जाणून घेऊयात...

| Jul 11, 2023, 09:02 AM IST
1/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावणार आहे. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिम इस्रो एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च करणार आहे.

2/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

चंद्रयान-3 लॉन्चिंग व्हेइकलच्या मदतीने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन आकाशात झेपावणार आहे. यासंदर्भातील जोरदार तयारी सध्या या ठिकाणी सुरु आहे. भारताची ही तिसरी मोहीम आहे. दुसऱ्यांदा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डींगचा प्रयत्न करणार आहे. तसेच चंद्रयान-3 मधील रोव्हर चंद्रावर उतरवून तेथील माहिती मिळवण्याचा भारतीय शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.

3/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

यापूर्वी केवळ 3 देशांना यशस्वीपणे चंद्रावर सॉफ्ट लॅण्डींग करता आली आहे. यात अमेरिका, रशिया आणि चीनचा समावेश आहे. चंद्रयान-2 मोहीम काही प्रमाणात यशस्वी ठरल्यानंतर आता चंद्रयान-3 च्या माध्यमातून भारताची मोहीम यशस्वी होईल अशी आशा सर्वच भारतीयांना आहे.

4/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

यंदा चंद्रयान-3 मध्ये ऑर्बिटरचा समावेश नाही. यंदाचं चंद्रयान थेट प्रोपल्शन मॉड्यूलनुसार लॉन्च केलं जाईल. म्हणजेच एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडला जातो तसं हे लॉन्चिंग असेल.

5/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

वर फोटोत दिसणारा भाग हा चंद्रयान-3 चा लॅण्डर आहे. याच्या खालील भागात प्रोप्लशन मॉड्यूल लावून ते रॉकेटला जोडलं जाणार आहे.

6/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

इस्रोने चंद्रयान-3 चं सुरुवातीचं बजेट 600 कोटी पर्यंत असेल अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र या प्रकल्पासाठी एकीण 615 कोटींचा खर्च आला आहे.

7/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

मात्र चंद्रयान-3 हे भारताचं सर्वात महागडी मोहीम आहे का? चंद्रयान-2 साठी किती खर्च आला होता? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या चंद्रयान-2 बद्दल जाणून घेऊयात.

8/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

चंद्रयान-2 च्या मोहीमेचा एकूण खर्च हा 'अवतार' आणि 'एव्हेंजर्स एण्डगेम' या चित्रपटांच्या निर्मितीच्या खर्चापेक्षाही कमी होता. 'एव्हेंजर्स एण्डगेम' चित्रपट निर्मितीसाठी 2443 कोटी तर अवतारच्या निर्मितीसाठी 3282 कोटींचा खर्च आला होता.

9/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

चंद्रयान-2 च्या संपूर्ण मोहीमेचा खर्च 978 कोटी रुपये इतका होता. यामध्ये 603 कोटी मोहीमेचा खर्च आणि 375 कोटी रुपये लॉन्चिंगसाठी खर्च करण्यात आले होते. म्हणजेच लॉन्चिंगच्या रॉकेटच्या निर्मितीसाठी नंतरचा 375 कोटींचा खर्च आला होता.

10/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

चीनच्या चांग-ई 4 या चंद्र मोहीमेचा खर्च 69.38 लाख कोटी रुपये इतका होता. तर अमेरिकने त्यांच्या चंद्र मोहीमेसाठी आतापर्यंत 825 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच निल आर्मस्ट्रॉग यांच्या चंद्र मोहीमेपासून आतापर्यंतचा हा खर्च आहे. रशियाने चंद्र मोहिमांसाठी आतापर्यंत एकूण 165 कोटी रुपये खर्च केले आहेत. या तुलनेत भारताच्या चंद्र मोहिमा फारच स्वस्तात झाल्या आहेत.

11/11

Cost Of ISRO Chandrayaan 3

भारताने चंद्रयान-1 मोहीम 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च केली होती. ही मोहीम 28 ऑगस्ट 2009 पर्यंत सक्रीय होती. चंद्रावर पाण्याचा शोध या माध्यमातून घेण्यात आला. यासाठी 386 कोटी खर्च करण्यात आले.