Reverse Dieting म्हणजे काय? जास्त त्रास करुन न घेता वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग?

What Is Reverse Diet: आज आपण रिव्हर्स डाएटिंगबद्दल जाणून घेणार आहोत. या रिव्हर्स डाएटच्या मदतीने वजनावर नियंत्रणं मिळवणं अधिक सोपं आणि सहज शक्य होईल. चला मग जाणून घेऊयात रिव्हर्स डाएटिंग कसं करतात आणि त्यामुळे वजन कसं कमी होतं.

Mar 03, 2023, 20:03 PM IST
1/5

स्थूलपणा हा सध्या आरोग्यासंदर्भातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयांपैकी एक आहे. स्थूलपणाची समस्या असलेल्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र स्थूलपणाला मुख्यपणे 2 गोष्टी कारणीभूत असतात. पहिली म्हणजे चुकीची लाइफस्टाइल आणि दुसरी आरोग्यासाठी फायद्याचे नसणाऱ्या पदार्थांचं मोठ्याप्रमाणात सेवन करणं.

2/5

Reverse Dieting

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्यापैकी अनेकांची दिनचार्या फिक्स नसते. झोपण्याची, जाण्याची आणि जेवणाच्या वेळाही निश्चित नसतात. त्यामुळेच वजन वाढतं. याशिवाय वजन वाढण्यासाठी रिफाइंड कार्ब्स, शुगर, फॅट्स भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचम सेवनही कारणीभूत ठरतं.

3/5

Reverse Dieting

रिव्हर्स डाएटिंगमध्ये हळूहळू कॅलरीचं प्रमाण वाढवणं अपेक्षित असतं. आठवड्यातून किमान 2 वेळा हे करणं अपेक्षित आहे. यानंतर तुमचं वजन किती आहे आणि शरीरामध्ये काय बदल झाला आहे हे समजू शकतं.

4/5

Reverse Dieting

जर तुमचं शरीर आधीसारखं वाटत असेल तर डाएटमध्ये 100 ते 150 कॅलरीजचं सेवन वाढवावे. हे रुटीन जवळवजळ 3 ते 5 आठवडे फॉलो करावे. त्यानंतर वजन पूर्वी होतं तितकं आहे की कमी झालं आहे हे तपासवं. वजनामध्ये काहीही फरक वाटल्यास तुम्ही डाइटच्या माध्यमातून वाढलेल्या कॅलरीज कमी करणं अपेक्षित असतं. तुम्ही अधिक कॅलरीजचं सेवन केल्याने तुमचं शरीर अधिक कॅलरीच बर्न करु लागतं. नंतर शरीराला ही सवय झाल्यानंतर तुम्ही वजन कमी केलं तरी कॅलरीज बर्न करण्याचा वेग कायम राहतो आणि त्याचा फायदा वजन आहे तितकं ठेवण्यासाठी होतो.

5/5

Reverse Dieting

हे रिव्हर्स डाएट फॉलो केल्याने शरीरामधील मेटाबायोलिझम वाढतं. या डाएट प्लॅनमुळे तुम्हाला फार वेळ उपाशी रहावं लागणार नाही. तसेच वीकनेसही वाटत नाही. त्याशिवाय रिव्हर्स डाएटिंगचा अवलंब करुन तुम्हाला शरीरामधील एनर्जी कायम ठेवता येते. तसेच तुमची एकाग्रता वाढवण्यासही मदत होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही. आरोग्यासंदर्भातील समस्यांबद्दल आधी आपल्या फॅमेली डॉक्टर्सचा सल्ला घ्यावा.)