विराट कोहली क्रिकेट मॅच खेळताना कोणते बूट वापरतो? किंमत ऐकून धक्काच बसेल

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. विराट कोहलीची बॅट, जर्सी, क्रिकेट किट याबाबत फॅन्समध्ये नेहमीच उत्सुकतता असते. तो क्रिकेट खेळताना जे सामान वापरतो ते आपल्याकडेही असावे असे अनेकांचे वाटत असते. तेव्हा विराट कोहली क्रिकेट मॅच खेळताना कोणते बूट वापरतो? त्यांची काय वैशिष्टय आहेत तसेच त्याची किंमत किती याबाबत जाणून घेऊयात. 

| Sep 23, 2024, 18:16 PM IST
1/6

क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू मोठे स्पाइक असलेले बूट घालतात. ज्यामुळे त्यांना मैदानात धाव घेणे आणि पळणे सोपे होते. त्यांना पळताना चांगली ग्रीप मिळते. जवळपास आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारे प्रत्येक खेळाडू असेच बूट वापरताना पाहायला मिळतात.

2/6

एसजी (SG) हा भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा स्पोर्ट्स ब्रँड आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या टेस्ट सामन्यांमध्ये याच कंपनीचे लेदर बॉल्स बहुतेकदा वापरले जातात. एसजीच्या अधिकृत वेबसाईट स्पाइक असलेल्या बूटांची किंमत 2,000 ते 3,000 रुपयांदरम्यान आहे. बूटांच्या क्वालिटीनुसार याची किंमत वाढते. 

3/6

स्पाईक असलेल्या Adidas आणि Puma सारख्या ब्रँडच्या बूटांची किंमत 10-20 हजार रुपयांपर्यंत असते. तर क्वालिटी आणि डिझाईननुसार बुटांची किंमत वाढूही शकते.  

4/6

विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असून त्याची फिटनेस, स्टाईल स्टेटमेंट फॅन्स सर्वजण फॉलो करतात. विराट कोहली जागतिक क्रीडा कंपनी प्यूमाचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे आणि हीच कंपनी त्याच्यासाठी बूट बनवते.

5/6

DSC या भारतीय स्पोर्ट्स कंपनीच्या मते, विराट कोहली मॅच दरम्यान जे बूट वापरतो ज्याची किंमत 20-30 हजारांच्या दरम्यान आहे. विराट कोहली प्यूमा या ब्रँडचे स्पाईक असलेले बूट वापरतो.   

6/6

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात विराट कोहली फलंदाजीत समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. विराटने फलंदाजी  करताना 23 धावा केल्या. मात्र विराट कोहली यासह भारतात खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक 12000 धावा करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. तर पहिल्या क्रमांकावर 14 हजार धावांसह सचिन तेंडुलकर आहे.