'L' चा नेमका अर्थ काय? SRH च्या अभिषेक शर्माने अखेर सांगितलं सेलिब्रेशनचं गुपित

Abhishek Sharma: 'L' चा नेमका अर्थ काय? SRH च्या अभिषेक शर्माने अखेर सांगितलं सेलिब्रेशनचं गुपित. यंदाची इंडियन प्रीमियर लीग सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याच्यासाठी खास राहिली.

| May 21, 2024, 10:56 AM IST
1/7

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्माने जगातील घातक ओपनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रेविस हेडसोबत विस्फोटक भागेदारी केलीये.

2/7

कोहलीचा रेकॉर्ड मोडला

यंदाच्या आयपीएलमध्ये अभिषेक शर्माने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला. त्याने आयपीएल हंगामातील सर्वाधिक षटकार खेचले.

3/7

13 सामन्यात 41 सिक्स

अभिषेक शर्माने 13 सामन्यात 41 सिक्स मारलेत. त्यामुळे टीम इंडियाला युवराजच्या मार्गदर्शनाखाली नवा सिक्सर किंग मिळालाय.

4/7

L सेलिब्रेशन

मात्र, सध्या चर्चा होतीये ती अभिषेक शर्माच्या L सेलिब्रेशनची... त्याच्या या सेलिब्रेशनचं कारण त्याने स्वत: उघड केलंय.

5/7

सेलिब्रेशनची सुरुवात

पहिल्या सामन्यापासून युनिक अशा L सेलिब्रेशनची सुरुवात ट्रॅव्हिस हेड आणि मी केली होती, असं अभिषेक शर्माने सांगितलं. 

6/7

L म्हणजे प्रेम

असं सेलिब्रेशन आमच्यासाठी खूप वैयक्तिक आहे, सर्वांना वाटतं 'L' म्हणजे प्रेम, आम्ही प्रेम शेअर करत आहोत, असं अभिषेक शर्मा म्हणतो.

7/7

फॅमिली

माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे कारण माझी संपूर्ण फॅमिली सामना पाहण्यासाठी आली होती, असं अभिषेक शर्माने म्हटलं आहे.