पांड्याने नताशाला पोटगी म्हणून खरंच 70% संपत्ती दिली, तर त्याच्याकडे किती पैसे उरतील?

70% Of Hardik Pandya Net Worth: हार्दिक पांड्या हा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल अशी चर्चा आहे. पण पंड्याची 70 टक्के संपत्ती म्हणजे नेमकी किती रक्कम त्याला नताशाला द्यावी लागणार? एवढी पोटगी दिल्यावर त्याच्याकडे किती रक्कम उरणार? जाणून घेऊयात..

| May 27, 2024, 15:45 PM IST
1/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.   

2/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

काही दिवसांपूर्वी नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून पांड्या हे नाव काढून टाकल्याने या कथित घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नताशा मागील आयपीएल पर्वांप्रमाणे यंदा एकाही सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित दिसली नाही. 

3/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

दुसरीकडे हार्दिक पंड्याने नताशाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाच दिल्या नसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. ही सगळी चर्चा सुरु असतानाच आता हार्दिकने नताशाला घटस्फोट घेतला तर हार्दिकच्या पॉपर्टीचा 70 वाटा तिला पोटगी म्हणून मिळणार असल्याचा दवा केला जात आहे.  

4/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

अनेक वेबसाईट्सने यासंदर्भातील बातम्या दिल्या आहेत. मात्र हार्दिक पंड्याच्या संपत्तीच्या 70 टक्के संपत्ती म्हणजे किती? हार्दिकची एकूण संपत्ती किती आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात...

5/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याची एकूण संपत्ती 91 कोटी रुपयांची आहे. तसेच जाहिराती आणि ब्रॅण्ड प्रमोशनमधून त्याला बरीच रक्कम मिळते. बीसीसीआयच्या केंद्रीय कंत्राटानुसार तो ए ग्रेडेट क्रिकेटपटू असल्याने दरवर्षी त्याला बीसीसीआय 5 कोटी रुपये देते. 

6/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

तसेच हार्दिक पंड्या इंडियन प्रिमिअर लीगमधूनही बराच पैसे कामवतो. 2022 आणि 23 मध्ये गुजरात जायंट्सने त्याला 15-15 कोटी रुपये दिले होते. तो आयपीएलदरम्यान इतरही अनेक प्रोडक्ट प्रमोट करतो. नताशा अनेकदा त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित असल्याचं यंदाचं वर्ष वगळता मागील अनेक वर्षांत दिसून आलं.  

7/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

हार्दिककडे अनेक आलिशान कार्स आहेत. ऑडी ए6, रेंज रोवर व्होग, जीप कंपास, मर्सिडीज जी वॅगन, रोल्स रॉयस, लॅम्बॉर्गिनी हुराकन ईबीओ, पोर्श केयेन और टोयोटा इटियोस  

8/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

मुंबईतील वांद्रे येथे हार्दिक पंड्याचं 30 कोटींचं घर आहे. तसेच वडोद्यामध्येही त्याचं 3.1 कोटी किंमतीचं मोठं घर आहे.   

9/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

आता हार्दिकच्या एकूण संपत्तीच्या 70 टक्क्यांबद्दल बोलायचं झालं तर 91 कोटींच्या हिशोबाने ही रक्कम 63 कोटी 70 लाख इतकी होती. म्हणजेच खरंच नताशाला 70 टक्के रक्कम मिळाली तर ती 63 कोटी 70 लाख इतकी असेल.  

10/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

म्हणजेच नताशाला 70 टक्के संपत्ती दिल्यास हार्दिककडे 27 कोटी 30 लाख रुपये इतकीच संपत्ती शिल्लक राहील.   

11/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

दुसरीकडे हार्दिकचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत हार्दिकने त्यांची 50 टक्के संपत्ती ही त्याच्या आईच्या नावावर केली आहे, असं सांगता दिसतोय.  

12/12

70 percent Of Hardik Pandya Net Worth Natasa Stankovic divorce

म्हणजेच हार्दिकची 45 कोटी 50 लाखांची संपत्ती आईच्या नावावर आहे असं गृहित धरलं तरी त्याच्या नावावरील 45.50 कोटींमधून 70 टक्के दिले तर नताशाला 31 कोटी 85 लाख रुपये पोटगी मिळेल. तर हार्दिककडे केवळ 13 कोटी 65 लाख रुपये शिल्लक राहतील.