10वी, 12 वी ला नापास झाले, लोकांनी खिल्ली उडवली; मग बनले IAS-IPS अधिकारी

  देशात असे अनेक आयएएस-आयपीएस आहेत जे 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत नापास झाले होते किंवा त्यांना कमी गुण मिळाले होते. पण नंतर त्यांनी देशातील कठीण परीक्षा यूपीएससी क्रॅक केली.

| May 27, 2024, 15:14 PM IST

10th 12th Failed IAS IPS Officer:  देशात असे अनेक आयएएस-आयपीएस आहेत जे 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत नापास झाले होते किंवा त्यांना कमी गुण मिळाले होते. पण नंतर त्यांनी देशातील कठीण परीक्षा यूपीएससी क्रॅक केली.

1/7

10वी, 12 वी ला नापास झाले, लोकांनी खिल्ली उडवली; मग बनले IAS-IPS अधिकारी

UPSC Success Story 10th 12th Students Become IAS IPS Officer Inspirational Story

UPSC Success Story: महाराष्ट्र बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात बहुतांश जणांना यश मिळाले. तर काही जण कमी गुण मिळाल्याने, अथवा नापास झाल्याने निराश झाले आहेत.  प्रत्येक वेळी अपयश आपल्याला काहीतरी शिकवते. देशात असे अनेक आयएएस-आयपीएस आहेत जे 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत नापास झाले होते किंवा त्यांना कमी गुण मिळाले होते. पण नंतर त्यांनी देशातील कठीण परीक्षा यूपीएससी क्रॅक केली.

2/7

IAS अंजू शर्मा

अंजू शर्मा या गुजरात केडरच्या 1991 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. अंजू दहावीच्या पूर्व बोर्ड परीक्षेत रसायनशास्त्रात नापास झाल्या होत्या. बारावीमध्ये असताना अर्थशास्त्रात नापास झाल्या होत्या. यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यास केला. त्यांनी B.Sc आणि नंतर MBA केले. कॉलेजमध्ये सुवर्णपदक विजेती होत्या. त्यानंतर अंजू यांनी वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. 

3/7

IPS मनोज शर्मा

मनोज शर्मा हे महाराष्ट्र केडरमधील यूपीएससी 2005 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्याच्या जोरा तालुक्यातील बिलगाव या गावचे रहिवासी आहेत. मनोज शर्मा बारावीत नापास झाले होते. पण नंतर ते आयपीएस झाले. मनोज शर्मा यांच्या जीवनावर '12वी फेल' नावाचा चित्रपटही बनवण्यात आला आहे. 

4/7

IPS जगदीश बनगरवा

जगदीश बनगरवा हा राजस्थानच्या बाडमेरचे रहिवासी आहेत. ते 2018 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी आयपीएस झाले. जगदीश दहावीत नापास झाले होते. दुसऱ्या प्रयत्नात ते दहावी उत्तीर्ण झाले. बारावीतही त्यांना केवळ 38 टक्के गुण मिळाले होते. 2018 मध्ये जगदीश यांनी भारतीय नागरी सेवा परीक्षा दिली. त्यांना 486 वा क्रमांक मिळाला आहे.

5/7

IAS कुमार अनुराग

कुमार अनुराग 2018 मध्ये आयएएस अधिकारी बनले. अनुराग शाळेच्या पूर्व बोर्ड परीक्षेत नापास झाले होते. पण अनुरागने हिंमत हारली नाही. पुढे जाऊन यूपीएससीची परीक्षा त्यांनी दोनदा पास केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 677 वा रँक मिळवला होता.

6/7

ईश्वर गुर्जर

राजस्थानचे ईश्वर गुर्जर 2011 मध्ये दहावीत अनुत्तीर्ण झाले. अभ्यास सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण शेतकरी वडिलांनी त्यांना समजावले. 12 वीमध्ये त्यांना 68 टक्के मिळाले. बीए केलं. यूपीएससीमध्ये 3 वेळा नापास झाले पण हार नाही. मानली. चौथ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया 644 रॅंकिंग मिळवली. त्यांनी अजूनही हार मानली नाही. ते पुन्हा यूपीएससी देत आहेत.

7/7

IPS आकाश कुलहरि ..

बीकानेर येथे राहणारा एक विद्यार्थी ज्याला कमी गुण मिळाल्याने शाळेतून काढण्यात आले. तो पुढे जाऊन आयपीएस अधिकारी बनतो. IPS आकाश कुलहरि हे उत्तर प्रदेशच्या पोलीस फायर डिपार्टमेंटचे डीआयजी आहेत. आकाश यांनी 1996 साली दहावीची परीक्षा दिली. त्यांना 57 टक्के मिळाले. कमी गुणांमुळे त्यांना शाळेतून काढण्यात आले. पण त्यांनी हार मानली नाही. बारावीमध्ये 85 टक्के मिळवले. यानंतर 2001 मध्ये दुग्गल कॉलेज बिकानेरमधून बीकॉम केले आणि दिल्लीच्या जेएनयूमधून एमकॉम केले. 2005 एमफील आणि 2006 मध्ये पहिल्या प्रयत्नात आकाश यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.