Weird Wedding: लग्नातील अजब-गजब प्रथा! कुठे एक तास रडते वधू , तर कुठे बाथरुममध्ये जाण्यास मनाई

Weird Wedding Rituals: जगभरात लग्नाच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. या प्रथांबाबत ऐकल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. या प्रथा परंपरामागे काही कारणं देखील आहेत. चला तर जाणून घेऊयात जगाभरातील लग्नाच्या विचित्र परंपरांबाबत..

Dec 12, 2022, 19:55 PM IST
1/5

weird wedding rituals

लग्न ही एक भावनिक नातं आहे. आपल्या कुटुंबापासून विभक्त होताना मुलगी रडते. पण चीनच्या काही भागात रडणे हा लग्नाचा भाग आहे. पण लग्नाच्या एक महिना आधी नववधूंना रोज तासभर रडावे लागते.

2/5

weird wedding rituals

फ्रान्समध्ये, नवविवाहित जोडप्यांना चेंबरच्या पॉटमध्ये पाहुण्यांचं उरलेले अन्न दिले जाते. हे अन्न नवीन जोडप्यांना ऊर्जा देण्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. पण आता त्यात बदल झाला आहे. आता जोडप्यांना चॉकलेट आणि शॅम्पेन दिली जाते.

3/5

weird wedding rituals

मलेशिया आणि इंडोनेशियातील बोर्नियो येथील टिडोंग लोक नवविवाहित जोडप्याला तीन दिवस बाथरूम वापरू देत नाहीत किंवा घराबाहेर पडू देत नाहीत. एक रक्षक त्यांच्यावर लक्ष ठेवतो. जिवंत राहण्यासाठी थोडे अन्न खाऊ शकतात.

4/5

weird wedding rituals

लग्नाचा दिवस हा जोडप्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस असतो. पण काँगोमध्ये असे नाही. काँगोमध्ये लग्न म्हणजे फक्त प्रेम नाही.  दोन कुटुंबे वधूच्या किंमतबाबत वाटाघाटी करतात आणि जनावरांची देवाणघेवाण करतात तेव्हा पूर्ण होते.

5/5

weird wedding rituals

केनियातील मसाई लोकांमध्ये वधूचे वडील मुलीच्या डोक्यावर आणि स्तनांवर थुंकतात. यानंतर वधू आपल्या पतीसोबत निघून जाते आणि तिला मागे वळून न पाहण्याचा सल्ला दिला जातो. तिने मागे वळून पाहिले तर ती दगड होते असा समज आहे.