Real Life Weight Loss Story : जंकफूड खाऊन 7 महिन्यात डॉ. शशांकने कमी केलं 30 किलो वजन कमी, असा होता डाएट
Real Weight Loss Story : प्रत्येकाचा वजन कमी करण्याचा प्रवास वेगळा असतो. डॉ. शशांक सिंघल यांनी आपला वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला आहे. यामधून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. आणि वाचून ती व्यक्ती हेल्दी लाइफस्टाइलकडे वळू शकते.
प्रत्येकाचा वजन कमी करण्याचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी एक अनोखं कारण शोधत असतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी डॉ शशांक सिंघल यांनी वजन कमी करण्याचा विचाक केला. पेशाने शिक्षक असलेल्या डॉ. शशांक यांनी म्हटलं की, मला जाणवू लागलं की, माझा स्टॅमिना कमी झालाय. तसेच मी बराचकाळ मुलांना शिकवू शकत नव्हतो. तसेच हृदयाशी संबंधित त्रासही डोके वर करू लागले होते. या वजनामुळे कधी आपला मृत्यू होईल, अशी भीती देखील वाटू लागली.
एवढंच नाही तर अशावेळी त्यांना त्याच्या वहिनीचे शब्द कानी पडले, शशांक वजन कर, नाहीतर भविष्यात त्रास होईल. डॉ. शशांक सिंघल यांच्याशी या फिटनेस जर्नीबद्दल चर्चा केल्यावर त्यांनी हा प्रवास उलघडला.