Weekly Money Horoscope : हा आठवडा 5 राशींच्या घरात पैशांचा पाऊस!

Weekly Money Horoscope 29 May to 04 June 2023 : शुक्रच्या संक्रमणामुळे काही राशींच्या घरी या आठवड्यात पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या यात समावेश आहे का जाणून घ्या या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य.

May 28, 2023, 07:19 AM IST

Weekly Money Horoscope 29 May to 04 June 2023 : निर्जला एकादशी, गुरु प्रदोष व्रत आणि शुक्र गोचर यामुळे हा आठवडा आर्थिकदृष्ट्या काही राशींना मालामाल ठरणार आहे. 

1/13

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

मे महिन्याचा शेवटचे तीन दिवस आणि जून महिन्याची सुरुवात असा हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

2/13

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. अनेक मार्गाने तुम्हाला धनलाभाचा योग आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडात चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे दिवस असणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होतील.

3/13

वृषभ (Taurus)

हा आठवडा तुमच्यासाठी खर्चिक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक निर्णय घ्या. काही गोष्टी तुम्हाला अस्वस्थ करतील. काही कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती जरा सुधारेल.  

4/13

मिथुन (Gemini)

या राशींची लोक त्यांचा कार्यक्षेत्रात खूप प्रगती करणार आहेत. प्रोजेक्टमधून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. प्रवासातून आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यात ठिक ठाक असणार आहे. 

5/13

कर्क (Cancer)

या राशींच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रवासातून नवीन लोकांची ओळख होईल. त्यातून भविष्यात आर्थिक फायदा होणार आहे. ऑफिसमध्ये महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. 

6/13

सिंह (Leo)

हा राशींसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला असणार आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. कुटुंबासोबत आनंदायी क्षण व्यतीत करणार आहात. मात्र एखादा प्रोजेक्ट तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. 

7/13

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कुटुंबात प्रेम वाढणार आहे. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट तुम्हाला विचलित करु शकतो. 

8/13

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. प्रगती, यश आणि मान सन्मान असा हा आठवडा असणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला हा आठवडा चांगला असणार आहे. कौटुंबिक वाद चर्चेतून तुम्ही सोडवू शकाल. 

9/13

वृश्चिक (Scorpio)

हा आठवडा या राशीसाठी त्रासदायक ठरणाार आहे. आर्थिक व्यवहाराबद्दल जरा सतर्क राहा. आर्थिक नुकसानचे संकेत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी खर्चिक ठरणार आहे. घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. बाह्य हस्तक्षेप तुमच्यासाठी कठीण ठरणार आहे. 

10/13

धनु (Sagittarius)

हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. लक्ष्मी तुमच्या दारावर प्रत्येक मार्गातून येणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या. पैशा येणार पण तो खर्च पण होणार आहे. 

11/13

मकर (Capricorn)

हा आठवडा आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.  प्रोजेक्टमधून फायदा होणार आहे. आरोग्यकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहारातून अनेक मार्गाने धनलाभ होणार आहे. 

12/13

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना धनवृद्धीचे शुभ योग जुळून आले आहेत. ऑफिसमध्ये नकारात्मक बातमी तुम्हाला अस्वस्थ करु शकते. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या प्रगतीशील असणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंदाची बातमी मिळणार आहे.   

13/13

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे. गुंतवणुकीतून धनलाभ होणार आहे. अनेक शुभ वार्ता मिळणार आहेत. सुख समृद्धीने संपूर्ण असा हा आठवडा असणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)