Weekly Horoscope : डिसेंबरचा पहिला आठवडा 'या' लोकांसाठी तिप्पट नफासह करिअरमध्ये प्रगतीचा; पाहा मेष ते मीन राशीभविष्य

Weekly Horoscope 2 to 8 december 2024 in Marathi : डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा महिना. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात मराठीतील महिना मार्गशीर्षने होतंय. त्यासोबत या आठवड्यात शुक्र आणि मंगळ ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. अशा स्थितीत कर्क आणि तूळ राशीसह 5 राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत जबरदस्त फायदा होणार आहे.  प्रगतीसह व्यवसायासाठी तुम्ही ज्या योजनांवर काम करत आहात त्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा थोडा आरामदायी असून तुमच्यावरील कामाचा ताण थोडा कमी होणार आहे.

| Dec 01, 2024, 14:31 PM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

या  राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती घेऊन आला आहे. नवीन प्रकल्पातून त्यांना यश मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीचा कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यायचा आहे. आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा पाहिला मिळणार आहे. कोणतीही नवीन आरोग्य क्रियाकलाप आनंददायी परिणाम घेऊन आली आहे. कुटुंबातील बहुआयामी दृष्टिकोन जीवनात शांतता आणणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळतील. या आठवड्यात आर्थिक खर्चही जास्त होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आपण एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल चिंतित असणार आहे. शुभ दिवस : 3,4

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. कोणत्याही नवीन प्रकल्पातून तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीने जीवनात सुख-शांती लाभणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत प्रवास करण्याच्या मूडमध्ये असणार आहात. सहली गोड आठवणींनी भरलेली असणार आहे. या आठवड्यात खर्चही वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जितके धैर्य धराल तितके यशस्वी तुम्हाला मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. शुभ दिवस: 4,5

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत चढ-उतारांचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी संमिश्र अनुभव मिळणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य खूप सुधारणा पाहिला मिळणार असून तुम्हाला निरोगी वाटणार आहे. आर्थिक बाबतीत, तरुणांना जास्त खर्च असणार आहे. जर तुम्हाला त्यांच्या यशाची खात्री असेल तरच या आठवड्यात सहलीला जाण्याचे बेत आखणार आहात. तुम्ही कुटुंबातील काही नवीन बदलांकडे वाटचाल करणार आहात. शनिवार आणि रविवार हे तुम्हाला भावनिक शांतता देणार आहे. शुभ दिवस: 4,6

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टबद्दल आत्मविश्वास वाटणार आहे. त्यातून तुम्हाला फायदा मिळणार आहे. पैशाच्या बाबतीत, वेळ तुमच्यासाठी अनुकूल असणार असून आर्थिक लाभाचे संकेत आहेत. प्रेमसंबंधांमध्ये सुख-समृद्धी राहणार आहे. तब्येत सुधारणा वाटणार असून तुम्हाला निरोगी वाटणार आहे. कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात प्रवासात अडचणी येतील. शुभ दिवस : 5, 6

5/12

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आदराने भरलेला असणार आहे. तुमच्या प्रकल्पाच्या यशाने तुम्ही आनंदी असाल आणि उत्सवाच्या मूडमध्ये राहणार आहात. खर्च जास्त असल्याने गुंतवणुकीकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत भविष्याचा विचार केल्यास फायदा मिळेल. भागीदारीत केलेल्या कोणत्याही कामात अडचणी येऊ शकतात. कुटुंबात काही मुद्द्यावरून वाद होतील. घराच्या नूतनीकरणावर खर्चही होणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रवास न केल्यास चांगले होईल, अन्यथा तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीची काळजी सतावणार आहे. शुभ दिवस : 4, 6

6/12

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक असणार आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन आरोग्य उपक्रम तुमचे आरोग्य सुधारणार आहे. प्रवासात समस्या निर्माण होणार आहे. प्रियजनांपासूनचे अंतरही वाढणार आहे. हा आठवडा कामातही कठीण असले. प्रकल्प पूर्ण करणे कठीण जाणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला एकटेपणा जाणवणार आहे. तुमचे मन अस्वस्थ असणार आहे. आठवड्याच्या शेवटी कोणाशीही वाद घालणे टाळा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे हिताच ठरेल. शुभ दिवस : 2,3

7/12

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक सिद्ध होणार आहे. तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारण्याच्या अनेक संधी मिळणार आहे. प्रवासासाठी हा आठवडा चांगला नसणार आहे. त्यामुळे सहल पुढे ढकलणे चांगले होईल. कुटुंबात मतभेद वाढणार आहे. याचे कारण आर्थिक अडचणी किंवा अन्य काही असू शकतात. जर तुम्ही तुमच्या शब्दांवर ठाम राहाल तर शेवटी तुम्हाला आनंद मिळेल. कामात अडचणी येतील आणि तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. शुभ दिवस: 2, 5

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या त्रासदायक असणार आहे. कोणतेही काम विचारपूर्वक करा, अन्यथा अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या मनाचे ऐकाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी काही प्रकल्पाबाबत मन अस्वस्थ राहणार आहे. कुटुंबात दिलेली आश्वासने पूर्ण होताना दिसणार नाही. पण इतर काही योजना तयार ठेवल्यास बरे परिणाम मिळतील. प्रवासादरम्यान कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीबद्दल चिंता वाटणार आहे. त्यामुळे प्रवास न केल्यास उत्तम होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही वाईट बातमी कानावर पडणार आहे. शुभ दिवस : 4

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळणार असून तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार आहे. व्यावसायिक सहली तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे. या आठवड्यात प्रवासही चांगला असणार आहे. तुम्हाला यशही लाभणार आहे. आर्थिक बाबतीत हुशारीने गुंतवणूक करणे तुमच्या हिताच ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही वाईट बातमी मिळेल. कोणतेही काम करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेणे हिताच ठरेल. तुमच्या संपत्तीत वाढ होणार असून प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. शुभ दिवस : 2, 3

10/12

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभेल. जीवनात सुख-समृद्धी येणार आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करून तुम्ही खूप काही साध्य करु शकता. अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तब्येत सुधारणा होणार आहे. महिला डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी चांगला ठरेल. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. प्रवासातून चांगली बातमी मिळणार आहे. प्रवासात यशस्वी होणार आहात. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडे आळशी वाटणार आहे. शुभ दिवस: 2, 3, 4

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार करणार आहात. प्रकल्प यशस्वी मिळणार असून कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी किंवा त्यांच्याशी संबंधित आनंद वाटणारी बातमी कानावर पडणार आहे. सहलीही उत्तम होणार आहे. सुखद अनुभव मिळेल. खर्च वाढणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीकडे लक्ष द्या. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धी राहणार आहे. शुभ दिवस : 2, 3, 4

12/12

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आणि आर्थिक लाभाचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशाशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. परस्पर प्रेम वाढणार आहे. तब्येत सुधारेल आणि आईसमान महिलेच्या मदतीने आरोग्य चांगले राहणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात. प्रवासात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे प्रवास न करणेच बरे ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी पार्टीचा मूड आणि सेलिब्रेशनच्या संधी तुम्हाला मिळणार आहे. शुभ दिवस : 2, 3, 5 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)