Weekly Horoscope : पितृपक्षाचा हा आठवडा कसा असेल? डबल राजयोग 'या' लोकांची करणार डबल कमाई

Weekly Horoscope 16 to 22 september 2024 in Marathi : गणेशाच विसर्जन आणि त्यानंतर पितृपक्षाचा प्रारंभ असलेला या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डबल राजयोग निर्माण होणार आहे. बुधादित्य राजयोग आणि शुक्रादित्य राजयोग काही लोकांची चांदी करणार आहे. कोण आहेत भाग्यशाली कोणावर होणार बाप्पाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य 

Sep 15, 2024, 23:17 PM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून तुमच्या इच्छेनुसार प्रकल्प यशस्वी होणार आहेत. तुम्हाला सुधारण्याच्या काही संधीचा फायदा देखील होणार आहे. या आठवड्यात तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय पैसे गुंतवू शकणार आहात. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या पद्धतींमध्ये काही बदल करण्याचा विचार करणार आहात. तुम्हाला त्याचा फायदाही होणार आहे. तुम्हीही याबाबत खूप जागरूक असणार आहात. कुटुंबात प्रेम आणि सौहार्द राहणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून खूप मदत मिळणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातूनही चांगले यश लाभणार आहे. शुभ दिवस: 17,18,19  

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आठवडा लाभ आणि कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. तुमच्या प्रकल्पाचे यश पाहून तुम्ही समाधानी असणार आहात. तुम्ही आर्थिक प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करणार आहात. नशीब तुमच्या पाठीशी उभं असणार आहे. आठवड्याच्या मध्यात काही कारणाने तुम्हाला नैराश्य किंवा तणावाचा सामना करावा लागणार आहे. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही दु:खी असणार आहात. या आठवड्यात सहली देखील पुढे ढकलल्या योग्य होईल. अन्यथा अनावश्यक ताण वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातील काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. सप्ताहाच्या शेवटी तरुण व्यक्तीची चिंता अधिक असणार आहे. शुभ दिवस: 17  

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक सिद्ध होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून कोणत्याही प्रकल्पाच्या सुरुवातीला तुमच्या मनात थोडी शंका येणार आहे. मात्र तुम्ही धैर्याने पुढे गेल्यास, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करणार आहात. तुमचे कुटुंब आणि ऑफिसमधील लोकांशी तुमचं नातं सुधारणार आहे. या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये अडचणी वाढणार आहे. तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूने प्रयत्न करावे लागणार आहे. या आठवड्यात, प्रवासादरम्यान काही लोक चिंतेने त्रस्त असणार आहेत. तुमच्या व्यवसायाची किंवा कार्यालयाची माहिती बाहेरील कोणाशीही शेअर करू नका. शुभ दिवस: 17,20  

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार आहे. लोक तुमच्या बुद्धीची प्रशंसा करणार आहेत. आर्थिक बाबतीत, खर्च जास्त असू शकतो आणि नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असणार आहे. तुमचे आरोग्य सुधारणार आहे. तुमचे जीवन आनंदात व्यतीत होणार असून तुम्ही तुमच्या कुटुंबाबाबत खूप आनंदी असणार आहात. हा आठवडा सहलींसाठी चांगला नाही. शुभ दिवस: 16,18,20  

5/12

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांना लाभ आणि प्रगती होणार आहे. ऑफिस आणि कुटुंबातील लोकांसोबत चांगली समजूतदारपणाने तुम्ही राहणार आहात. या आठवड्यात तुमचा तुमच्या प्रियजनांसोबतचा प्रकल्प यशस्वी होणार आहेत. आर्थिक बाबतीत समतोल राखून पुढे गेल्यास आनंदी राहणार आहात. या आठवड्यात तुम्हाला तब्येत साथ देणार आहे. तुम्ही अनेक आरोग्यविषयक कामांकडे आकर्षित होणार आहात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळतील. शुभ दिवस: 16,17  

6/12

कन्या (Virgo Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करणार आहेत. काही नवीन प्रकल्पाकडे तुम्ही झुकणार आहात ज्यामुळे तुमच्यासाठी यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्थिक बाबतीत सर्व काही ठीक होणार आहे. तरीही कोणत्याही गुंतवणुकीबाबत मन चिंतेत राहणार आहात. प्रेमसंबंधात रोमान्सचा प्रवेश होणार आहे. कौटुंबिक बाबतीत तुम्ही आळशी असाल तर तुमची प्रकृती बिघडू शकते. या आठवड्यात प्रवास टाळणे हिताच ठरणार आहे. शुभ दिवस: 17      

7/12

तूळ (Libra Zodiac)

या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी प्रगती करणार आहेत. त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा शुभ संयोग लाभणार आहे. भागीदारीत केलेली कामे प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. आर्थिक लाभ हळूहळू मिळणार आहे. तब्येतीत चढ-उतार पाहिला मिळेल. पण तुम्ही निष्काळजी न राहिल्यास तुम्हाला निरोगी वाटणार आहे. तुमच्या आयुष्यात अडचणी वाढणार आहेत. कौटुंबिक प्रश्न संवादाने सोडवले तर हिताच ठरणार आहे. तुम्हाला या आठवड्यात तुमच्या सहली यशस्वी करायच्या असतील तर त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल अन्यथा तुमचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे.  शुभ दिवस: 17      

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा मिळणार आहे. या आठवड्यात तुमची प्रगती होणार आहे. कौटुंबिक सहवासातही तुम्हाला आराम मिळणार आहे. आपण आपल्या कुटुंबासह एका चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेणार आहात. कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी संवादातून प्रश्न सोडवावेत, तरच प्रगती होणार आहे. आर्थिक बाबींमध्ये जास्त खर्च होणार आहे. तुम्ही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या आठवड्यात तब्येतीत सुधारणा होणार आहे. पण तरीही तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असणार आहे. या आठवड्यात, सहली दरम्यान एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल चिंता वाढणार आहे. सहली पुढे ढकलणे चांगले परिणाम देईल. शुभ दिवस: 18,20  

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असणार आहे. एखाद्या महिलेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात आराम मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. मान-सन्मानही वाढणार असून तरीही ते तुमच्या अपेक्षेपेक्षा कमीच असणार आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होणार असून आर्थिक फायद्याचेही संकेत आहेत. या आठवड्यात तुमची तब्येत सुधारणार आहे. तुम्हाला निरोगी आणि प्रसन्न वाटणार आहे. कुटुंबासमवेत फिरण्याचे बेत आखले जाणार आहेत. पण सहलींबाबतही मनात शंका असणार आहे. शुभ दिवस: 18,19,20

10/12

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही तुमच्या आवडी-निवडी उघडपणे व्यक्त केल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलणे चांगले ठरणार आहे. अन्यथा त्रास वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण होताना दिसणार नाही. या आठवड्यात, प्रवासामुळे त्रास देखील वाढणार आहे. शुभ दिवस: 17,18,20

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंद आणि समृद्धी घेऊन आला आहे. परस्पर प्रेम अधिक दृढ होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळणार आहे. प्रवासातही तुम्हाला यश मिळणार असून वडिलांच्या मदतीने तुम्हाला जीवनात सुख-शांती लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी भागीदारी प्रकल्पाबाबत तुम्हाला निराश वाटणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही गुंतवणूक वाढविण्याचा विचार करणार आहात. कोणताही गोंधळ सोडवला तर बरे परिणाम मिळणार आहे. या आठवड्यात आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शुभ दिवस: 18,19,20

12/12

मीन (Pisces Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात. प्रकल्प यशस्वी होणार असल्याने तुम्ही समाधानी असणार आहात. वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत, कोणतीही नवीन गुंतवणूक तुमच्यासाठी आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. प्रेम जीवनात सुखद अनुभव येणार आहेत. या आठवड्यात तुमचे आरोग्यही खूप सुधारणा होणार आहे. कुटुंबातील मातृत्व महिलेबद्दल तुम्हाला अधिक काळजी वाटणार आहे. या आठवड्यात प्रवासामुळे अधिक त्रास होणार आहे. शुभ दिवस: 16, 17 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)