LDL Cholesterol Symptoms : 'ही' 6 लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागली तर समजून जा, शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय

LDL Cholesterol Symptoms : कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास याला उच्च कोलेस्टेरॉल असं म्हटलं जातं. उच्च कोलेस्टेरॉल ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. 

Sep 15, 2024, 21:44 PM IST
1/7

उच्च कोलेस्टेरॉलची अनेक लक्षणं आहेत जी शरीराच्या वेगवेगळ्या भागात दिसून येतात. मात्र काही लक्षणे चेहऱ्यावर देखील दिसू शकतात. जर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं. 

2/7

Xanthomas हे लहान पिवळे ठिपके असतात जे सहसा डोळे, कोपर आणि गुडघ्याभोवती दिसून येतात. हे डाग उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

3/7

चेहऱ्यावर लहान, मऊ आणि पिवळे फोड दिसून येत असेल तर हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण असण्याची दाट शक्यता आहे. या गुठळ्या विशेषतः डोळ्याभोवती, नाकाच्या बाजूला किंवा चेहऱ्याच्या इतर भागांवर दिसतात. त्वचेखाली कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळेही या गुठळ्या निर्माण होत्यात. जर तुम्हालाही अशी चिन्हे दिसली तर तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याचा इशारा असण्याची दाट शक्यता आहे. 

4/7

तुमच्या चेहऱ्यावर सूज किंवा फुगीरपणा जाणवत असेल, विशेषत: डोळ्याभोवती, तर ही धोक्याची घंटा आहे. हे लक्षणं उच्च कोलेस्टेरॉलचं असू शकतं. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि चेहऱ्यावर सूज येते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या कोलेस्टेरॉलची पातळी तपासणे गरजेचे आहे. 

5/7

उच्च कोलेस्टेरॉलमुळे त्वचा पिवळी होऊ लागते. ही स्थिती कोलेस्टेरॉलच्या ऑक्सिडेशनमुळे उद्भवते, असं तज्ज्ञ सांगतात. 

6/7

उच्च कोलेस्टेरॉलमुळे हार्मोनल असंतुलन होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांचा धोका वाढतो.   

7/7

उच्च कोलेस्टेरॉलमुळे, तुमच्या त्वचेच्या तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात. ज्यामुळे तुमची त्वचा अत्यंत तेलकट दिसायला लागते. जर तुमच्या चेहऱ्यावरील तेलाचे प्रमाण अचानक वाढतं असेल. त्यामुळे तुमची त्वचा जास्त तेलकट दिसत असेल. हे लक्षण हलक्यावर घेऊ नका. हे लक्षणं उच्च कोलेस्ट्रॉलचं असण्याची शक्यता आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)