Weekly Horoscope : श्रावणाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार महादेवाची कृपा

Weekly Horoscope 12 to 18 august 2024 in Marathi : श्रावणाच्या या दुसऱ्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोगाची निमिर्ती झाली आहे. या योगाचा प्रभाव 12 राशींवर दिसून येणार आहे. त्यामुळे श्रावणाचा हा आठवड्यात कोणावर बसरणार महादेवाची कृपा आणि कोणाला करावं लागेल संकटाचा सामना जाणून घ्या मेष ते मीन राशीचं साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांच्याकडून 

| Aug 12, 2024, 12:10 PM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगती होणार आहे. हा आठवडा कामाच्या ठिकाणी यशाने परिपूर्ण असणार आहे. सर्जनशील कार्यातून यश मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रकल्पाच्या यशाने समाधानी असणार आहात. भागीदारीत केलेल्या कामात तुम्हाला पूर्ण लाभ आणि नफा मिळणार आहे. आर्थिक बाबतीत अनावश्यक वादविवाद टाळल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. कुटुंबातील काही परस्पर समस्यांमुळे तुम्ही काही काळ उदासीनता पाहिला मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रवासातही यशस्वी होणार आहात. सेलिब्रेशनच्या संधी तुम्हाला मिळणार आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती नांदणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटेल. आठवड्याच्या शेवटी थोडी जोखीम पत्करून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. शुभ दिवस: 13,15  

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती करणार आहेत. जर त्यांनी काहीतरी नवीन शिकून ते त्यांच्या प्रकल्पात लागू केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत तुम्ही आळशीपणाने घेरले असणार असल्याने तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून पुढे जाणार आहात. याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. या आठवड्यात कुटुंबाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थता असाल. आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी लाभ आणि आनंदाने भरलेला असणार आहे. शुभ दिवस: 15, 16  

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रचंड प्रगती आणि सन्मानही वाढणार आहे. तुमच्या आयुष्यातील महिलेमुळे तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होणमार आहे. आर्थिक बाबींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारांसोबत परस्पर संबंध दृढ होणार आहे. तब्येत सुधारेल आणि तुम्हाला निरोगी राहणार आहात. कुटुंबातील सदस्यासोबत वादही होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासात तुम्हाला यश मिळवून देणारा आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला खूप आराम आणि समाधन वाटणार आहे. शुभ दिवस: 12,13,15,16  

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभ आणि प्रगतीचा असणार आहे. तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. ऑफिसमधील सर्वांशी परस्पर संबंध सुधारणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक संधी मिळणार आहे. तुम्हाला निरोगी वाटणार असून तुमचे आरोग्य सुधारणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला अचानक कुटुंबात काही प्रतिकूल बातम्यांना सामोरे जावे लागू शकतं. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होणार आहे. आठवड्याच्या शेवटी चर्चा करून मुद्दे सोडवल्यास चांगले परिणाम मिळतील. शुभ दिवस: 13  

5/12

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात करणारा असणार आहे. तुमच्यासाठी शुभ परिणामाचा हा आठवडा असणार आहे. सर्जनशील कार्यातून यश मिळणार आहे. या आठवड्यात, काही नवीन आरोग्य क्रियाकलापांमुळे, आरोग्याचा मार्ग खुला होणार आहे. तुम्हाला आंतरिक ऊर्जा जाणवरणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी नियोजनाच्या मूडमध्ये असणार आहात. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. कुटुंबातील परस्पर प्रेम दृढ होणार असून तुम्ही कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यात तुम्हाला सहलींवर खूप कष्ट घ्यावे लागणार आहे. तुम्ही त्या पुढे ढकलल्यास ते चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगली बातमी मिळणार आहे. शुभ दिवस: 13,14,16  

6/12

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभाचे शुभ संकेत आहेत. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत अस्वस्थ आणि थोडे उदासीन असणार आहात. आठवड्याच्या शेवटी मन असंतुष्ट आणि अस्वस्थ राहणार आहे. तुमच्या जीवनातील हा आठवडा आर्थिक बाबतीत आनंद आणि समृद्धीपूर्ण असणार आहे. शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरणार आहे.  शुभ दिवस: 12,14   

7/12

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात लाभ आणि सन्मानाचा असणार आहे. या आठवड्यात आपण विजय रथावर पुढे जाणार आहात. आर्थिक बाबतीत निष्काळजी न राहिल्यास चांगले परिणाम मिळतील. तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी शिफ्ट होण्याचा निर्णय घेऊ शकता. तब्येतीत बरीच सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवणार आहात. कुटुंबात एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. प्रवासातही तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुमचे मन प्रसन्न राहील. आठवड्याच्या शेवटी खरेदीच्या मूडमध्ये असाल. शुभ दिवस: 14,15,16

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. आर्थिक बाबींमध्ये मन अस्वस्थ राहणार असून खर्च वाढणार आहे. परस्पर प्रेमात अहंकाराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. तब्येतीत अचानक बदल तुम्हाला चिंतेत टाकणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून तुम्हाला यश मिळून देईल. जरी आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्याही प्रवासाबाबत शंका असेल. कौटुंबिक प्रकरणातील परिस्थिती संवादाने सोडवली तर बरे परिणाम मिळतील. शुभ दिवस: 15

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

धनु राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात यश मिळेल. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहणार आहे. तुम्ही तुमच्या चांगल्या भविष्यासाठी नियोजनबद्ध मूडमध्ये असणार आहात. आरोग्याची नवी सुरुवात तुमच्यासाठी प्रेरणेचे मार्ग उघडणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश मिळणार आहे. कुटुंबात तुमच्या विचारावर ठाम राहिल्यास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला एकांतात वेळ घालवल्यासारखे वाटणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळणार आहेत. तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. शुभ दिवस: 12,13,16

10/12

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असणार आहे. जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सुधारणा होणार असून प्रकल्प यशाच्या मार्गावर पुढे जाणार आहात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत खूप जागरूक असणार आहात. अनेक आरोग्यविषयक कामांकडे तुमचा कल असणार आहे. कुटुंबातील नवीन सुरुवात तुमच्या जीवनात शांतता आणणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटणार आहे. शुभ दिवस: 13,14,15

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुधारणा दिसून येणार आहे. तुम्ही नवीन प्रकल्पाकडे आकर्षित होणार आहात. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असून आर्थिक लाभ होणार आहे. मात्र तुमची मर्यादित विचारसरणी तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्यही खूप सुधारणार आहे. तुम्हाला प्रसन्न आणि निरोगी वाटणार आहे. प्रवासात यश मिळणार असून मन समाधानी राहणार आहे. कुटुंबातील कोणत्याही तरुणाबद्दल मन चिंतेत राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने जीवनात शांतता नांदणार आहे. शुभ दिवस: 13,14,16

12/12

मीन (Pisces Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. नवीन उत्पादनाकडे त्यांचा कल असणार आहे. व्यवसायात काही नवीन प्रयोग करण्याचा विचार करू शकता. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबात तुम्हाला एकटेपणा जाणवेल आणि तुमचे मन अस्वस्थ राहणार आहे. आर्थिक बाबींमध्ये, खर्च जास्त होणार असल्यान लक्ष द्या. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्हाला वाईट वाटणार आहे. या आठवड्याच्या शेवटी, कठोर परिश्रमाच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनात भरपूर यश मिळवू शकता. शुभ दिवस: 15, 17 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)