ODI World Cup 2023: '...तर पाकिस्तान दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकेल', वसीम अक्रम यांनी सांगितलं कारण!

Wasim Akram On ODI World Cup 2023: पाकिस्तानचा महान खेळाडू वसीम अक्रमचा विश्वास आहे की, पाकिस्तानकडे यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात विजयी होण्यासाठी पुरेशी गुणवत्ता आहे.

Jun 27, 2023, 20:28 PM IST

Pakistan in Cricket ICC WC 2023: भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक (ICC Men’s Cricket World Cup 2023 schedule) आयसीसीने आज जाहीर केले. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्याने आता वर्ल्ड कपचा थरार आणखीच वाढणार आहे.

1/5

पाकिस्तानचा महान खेळाडू वसीम अक्रमचा विश्वास आहे की, पाकिस्तानकडे यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात विजयी होण्यासाठी पुरेशी गुणवत्ता आहे.

2/5

सर्वोत्तम खेळाडू तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये राहिल्यास या वर्षाच्या शेवटी दुसरी पाकिस्तानला वर्ल्ड कपची दुसरी ट्रॉफी मिळू शकेल, असं मत वसीम अक्रमने व्यक्त केलं आहे.

3/5

पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम या पहिल्या क्रमांकावर असलेल्या वनडे फलंदाजाकडे आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी अनुभवी खेळाडूंचा गट आहे, असंही वसिम अक्रम म्हणालाय.

4/5

जोपर्यंत बाबर आझम तंदुरुस्त आहेत आणि जोपर्यंत ते योजनेनुसार खेळतील, तोपर्यंत त्यांना त्या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याची संधी असेल. कारण हा वर्ल्ड कप भारतात म्हणजे आमच्या प्रकारच्या परिस्थितीत खेळला जातो, असंही अक्रम म्हणाला आहे.

5/5

पाकिस्तानने मागील 50 षटकांच्या विश्वचषकमध्ये नऊ पैकी पाच सामने जिंकले आहेत. 2019 मध्ये पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं.