OTT सब्सक्रिप्शन घेताना पैसे वाचवायचेत? तर वापरा 'या' टिप्स

सध्याचा काळात OTT चा वापर भरपूर प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या जे आवडतं ते पाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या OTT अॅपचं सबस्क्रिप्शन घेत असतो. पण एकाच अॅपमध्ये दोन ते तीन OTT वापरुन पैसे वाचवायचे आहेत? तर पुढील टिप्स नक्की वाचा. 

Jun 30, 2024, 16:41 PM IST

सध्याचा काळात OTT चा वापर भरपूर प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या जे आवडतं ते पाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या OTT अॅपचं सबस्क्रिप्शन घेत असतो. पण एकाच अॅपमध्ये दोन ते तीन OTT वापरुन पैसे वाचवायचे आहेत? तर पुढील टिप्स नक्की वाचा. 

1/9

बहुतेक OTT प्लॅटफॉर्म एक आठवड्यापासून एक महिन्यापर्यंत विनामूल्य चाचणी देतात. या दरम्यान, तुम्ही वेगवेगळ्या जॉनराचे किंवा पद्धतीचे कॉन्टेन्ट पाहू शकता. 

2/9

अशात तुम्ही जर फ्री ट्रायल घेत असला तर तो ट्रायल संपण्याची तारिख ही लक्षात ठेवा. नाही तर तुमचे पैसे थेट तुमच्या लिंक अकाऊंटवरून कापले जाण्याची शक्यता असते. 

3/9

अनेक OTT प्लॅटफॉर्म ग्रुप पॅक ऑफर करतात जे कमी किमतीत एकाहून अधिक सब्सक्रिप्शन एकत्र करतात. उदाहरणार्थ Disney+ चं देखील असाच एक ग्रुप आहे. ज्यात Hulu आणि ESPN+ समाविष्ट आहे.

4/9

तिन्ही प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन घेण्यापेक्षा हे बंडल पॅक घेणं स्वस्त आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार बंडल निवडून तुमचे पैसे वाचवू शकता.

5/9

OTT प्लॅटफॉर्म एकाच वेळी एकाहून अधिक प्रोफाईल तयार करण्यास किंवा एकाहून अधिक डिव्हाइसेसवर पाहण्याची मुभा देतात. या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या या अकाऊंटचा पासवर्ड हा कुटुंब किंवा मित्रांसह शेअर करू शकता.

6/9

अनेक OTT विशेष प्रसंगी सवलत किंवा ऑफर देतात. या ऑफर्स सुट्टीच्या दिवशी किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात येत राहतात. अश्या ऑफर्सवर लक्ष ठेवा. यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात.

7/9

काही OTT प्लॅटफॉर्म तुम्हाला अ‍ॅड फ्री किंवा अ‍ॅड म्हणजेच जाहिरातींसोबत पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला काय सोयीसकर आहे ते तुम्ही ठरवायला हवं कारण कमी किंमतीत तुम्हाला जाहिरात मिळण्याची शक्यता आहे.

8/9

जर तुम्हाला हाय रिझोल्यूशन स्ट्रीमिंगची आवश्यकता नसेल तर तुम्ही 4K स्ट्रीमिंग प्लानऐवजी सामान्य HD योजना खरेदी करून खूप बचत करू शकता.

9/9

तुमचे सब्सक्रिप्शन वेळोवेळी तपासा आणि गरज नसलेले सब्सक्रिप्शन काढू टाका. महिन्याचे सब्सक्रिप्शनऐवजी वार्षिक प्लान घेऊ शकता. कारण अनेक ठिकाणी वार्षिक सब्सक्रिप्शनवर सूट देतात, ज्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात.