दंडावरची चरबी कशी कमी करावी? 10 मिनिटे घरीच करा 'हे' व्यायाम

Arm Fat Burn Exercise: आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. पण आपण शरीरावर लक्ष देताना हायापायांकडे लक्ष देणं विसरतो. अशावेळी हातावर चरबी जमून ते थुलथुलीत होतात. मात्र हे कमी करण्यासाठी नक्की कोणता व्यायाम करायचा हे जाणून घ्या. त्याआधी नक्की हातावर चरबी का वाढते याची कारणे महत्त्वाची आहे.  

Jan 10, 2024, 14:56 PM IST

 

 

1/7

दंडावरची चरबी कशी कमी करावी?

आपल्या हातांची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला खाण्यावर बंदी घालण्याची गरज नाही. उलट काही प्रभावी व्यायाम नियमितपणे केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल. हे व्यायाम तुम्ही घरीही सहज करू शकता.

2/7

हातावरील चरबी वाढण्याचे कारण

हातावरील चरबी वाढण्याची अनेक कारणं आहेत, केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांनाही ही समस्या येऊ शकते. अनुवंशिकता, हार्मोन आणि वजन यामुळे हातावर चरबी वाढण्यास मदत होते. 

3/7

डाएट

हाताची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही डाएटमध्येही बदल करू शकता. यासाठी डाएटमध्ये सलाड, प्रोटीनयुक्त भाजी, फळं आणि फायबर खाणे सुरू करा. आपल्या डाएटिशियनचा सल्ला घेऊन तुम्ही याचा प्रयोग सुरू करू शकता. तसंच आहारामधील साखर कमी करा आणि कमी कॅलरीचे आहार खा. यामुळे फॅट्स त्वरीत कमी व्हायला सुरू होते.  

4/7

सिजर्स

सिझर व्यायाम केल्याने हाताची चरबी कमी होण्यास फायदा होतो. यामध्ये तुम्ही दोन्ही हात खांद्यापर्यंत वर घ्या. त्यानंतर हात क्रॉस करा आणि पुन्हा पहिल्यासारखे करा. हा व्यायाम साधारण 10 ते 12 सेट्स करा. काही दिवसातच तुमच्या हातावर जमा झालेली चरबी कमी होण्यास सुरूवात होईल.

5/7

बायसेप कर्ल

हाताची जास्त असलेली चरबी दूर करण्यासाठी तुम्ही बायसेप कर्ल व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही वजन खांद्यापर्यंत उचला आणि पुन्हा खाली घ्या. साधारण 5-10 सेट्स तुम्ही दिवसातून हे केल्यास, हातावरील चरबी त्वरीत कमी होण्यास सुरूवात होते.

6/7

ट्रायसेप्स डिप्स

या व्यायामामध्ये तुम्हाला एक खुर्चीची गरज भासते. दोन्ही हात खुर्चीच्या काठावर ठेवा आणि आपले शरीर त्या आधारावर वर आणि खाली करा. यामुळे हाताच्या मांसपेशीवर जोर येतो आणि हाताची चरबी कमी होण्यास मदत मिळते.  

7/7

पुशअप्स

शरीर आणि हाताची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही पुशअप्स करू शकता. हे रोज सकाळी 5-7 मिनिट्स हा व्यायाम केल्याने हाताला योग्य आकार मिळतो आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते.