Walking Benefits : दररोज 10,000 पावलं चालणं किती फायद्याचं? स्मार्टवॉचमध्ये आकडा पाहण्यापेक्षा वाचा ही माहिती

Walking Benefits : पण, इतका अट्टहास का? तर, हा अट्टहास आहे आरोग्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी.

Apr 16, 2023, 09:44 AM IST

Walking Benefits : हातावर स्मार्चवॉच लावून आपण दर दिवशी नेमके किती चालतोय हे हल्ली अनेकजण पाहताना दिसतात. काही कारणास्तव दिवसाला इतकी पावलं झाली नाहीत, तर शकपावलीची फेरी वाढवणं किंवा जास्त अंतर चालत जाणं अशा शकलाही लढवताना दिसत आहेत.

1/6

Walking

Walking Benefits in marathi latest health news

तुम्हाला माहितीये का, दररोज ठराविक अंतर चालल्यामुळं फुफ्फुसं, हृदय आणि संपूर्ण शरीलाला मोठा फायदा होतो. त्यामुळं दररोज 10 हजार पावलं चालून तुम्ही सहजपणे डॉक्टरांपासून दूर राहू शकता.

2/6

latest health news

Walking Benefits in marathi latest health news

नियमित वेगानं साधारण 10 हजार पावलं चालल्यास स्नायू मोकळे होण्यासोबतच बळकटही होतात. यामुळं हाडांचं आरोग्यही सुधारतं.

3/6

health news

Walking Benefits in marathi latest health news

मितेन सेज फिटनेस (एमएसएफ) चे फिटनेस कोच, मितेन काकैया यांच्या माहितीनुसार आरोग्याबाबतची ध्येय्य साध्य करण्यासाठी 10 पावलं चालण्याची सवय मदत करते.

4/6

Walking Benefits for good health

Walking Benefits in marathi latest health news

यासाठी तुम्ही काही हजार पावलांनी सुरुवात करून त्यानंतर 10 हजार पावलांचा टप्पा गाठू शकता. 10 हजार पावलं चालण्याच्या सवयीमध्ये सातत्य राखणं मात्र महत्त्वाचं.

5/6

Walking Benefitsin marathi

Walking Benefits in marathi latest health news

जाणून आश्चर्य वाटेल पण, 10 हजार पावलं चालून तुम्ही वजन घटवण्यासोबतच शरीरातील 500 कॅलरी बर्न करू शकता. त्यामुळं वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना इथं सहज यश मिळताना दिसेल.

6/6

Walking Benefits

Walking Benefits in marathi latest health news

10 हजार पावलं म्हणजे साधारण साडेतीन ते चार किलोमीटर इतकं अंतर दररोज चालल्यास यामुळं मानसिक आरोग्यही सुरळीत राहतं. तणाव आणि नैराश्य मोठ्या फरकानं कमी होतं. त्यामुळं दररोज 10 हजार पावलं चाला आणि निरोगी राहा.   (वरील माहिती अभ्यासकांच्या सल्ल्यानं घेतली असूस हे त्यांचं निरिक्षण आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)