Walkaway Wife Syndrome : एकत्र राहूनही नसतो पती- पत्नीच्या नात्यातील गोडवा; वैवाहिक नात्यात दुरावा येण्यापूर्वी दिसतात 'हे' बदल

Walkaway Wife Syndrome : नात्यात दुराव्याची चाहूल लागताच पत्नीकडून पतीला मिळते 'अशी' वागणूक.... नात्यातलं अंतर नेमकं कसं वाढत जातं? जाणून घ्या   

Jul 02, 2024, 12:50 PM IST

Walkaway Wife Syndrome : पती पत्नीचं नातं इतकं सुरेख असतं, की नात्यातील प्रत्येक दिवस दोघांनाही अधिक खंबीर करत असतो. अनेकदा आत्मविश्वासही देऊन जातो. इथं एकमेकांची साथच सर्वतोपरी महत्त्वाची असते. पण.... 

 

1/7

Walkaway Wife Syndrome

Walkaway Wife Syndrome husband wife relationship problems latest news

Walkaway Wife Syndrome : 'वॉकअवे वाइफ सिंड्रोम' म्हणजे वैवाहिक नात्यातील एक असा टप्पा जिथं पतीसोबत राहूनही पत्नीच्या वागण्यात बदल येतो. ती सोबत असूनही एकाकी राहत असते. तिचं हास्य हरवलेलं असतं. 

2/7

वैवाहिक नातं

Walkaway Wife Syndrome husband wife relationship problems latest news

ज्यावेळी वैवाहिक नात्यात काही कारणास्तव वितुष्ट येतं, त्याचवेळी अनेकदा पतीकडून आपल्याला अपेक्षित वागणूक मिळत नसल्याची भावना पत्नीच्या मनात घर करू लागते. पाहता पाहता पत्नीसुद्धा या नात्यात एकाकी पडते आणि इथंच वॉकअवे वाइफ सिंड्रोम डोकं वर काढतो.   

3/7

पतीचं दुर्लक्ष

Walkaway Wife Syndrome husband wife relationship problems latest news

ही स्थिती एक अशा परिस्थितीवर भाष्य करते जिथं वैवाहिक नात्यात तणाव असतानाही ते नातं टिकावं यासाठी प्रयत्न करणारी पत्नी अखेर हार पत्करते. पत्नी या निर्णयावर पोहोचण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असतात. यामध्ये पतीचं दुर्लक्ष किंवा एककेंद्री वृत्ती सर्वाधिक परिणाम करताना दिसते. हा काळ तोच असतो जेव्हा वैवाहिक नात्यातून पत्नी भावनिक, मानसिक आणि आर्थिकरित्याही बाहेर पडू इच्छिते.   

4/7

स्वभावातील बदल

Walkaway Wife Syndrome husband wife relationship problems latest news

लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात जी पत्नी मनसोक्त वावरत असते तिच्याच वागण्याबोलण्यात बदल येतात आणि अनेकदा या स्थितीसाठी ती स्वत:ला दोष देऊ लागते. पतीप्रती असणारी तिच्या मनातील ओढ कमी झालेली असते, ज्यामुळं नात्यांचे पाश तोडण्याची भावना तिच्या मनात घर करून जाते. 

5/7

तगादा

Walkaway Wife Syndrome husband wife relationship problems latest news

पत्नी कोणत्याही गोष्टीचा तगादा लावत नाही, यामुळं अनेकदा पतीला दिलासा मिळू शकतो. पण, तिच्या या वागण्याचा गांभीर्यानं विचार केला जाणं अपेक्षित असतं. पत्नीचं शांत राहणं वैवाहिक नात्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळं इथं जोडीदाराशी साधला जाणारा मनमोकळा संवाद अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. 

6/7

दुरावा

Walkaway Wife Syndrome husband wife relationship problems latest news

पती- पत्नीच्या नात्यात येणारा दुरावा गंभीर वळणावर पोहोचल्यानंतर अनेकदा पतीसोबत जवळीक साधण्यापासूनही पती दोन पावलं मागे हटते. नात्यात होणारे हे बदल भविष्यातील वादळाची चाहूल देऊन जातात.  

7/7

संवादाचा अभाव

Walkaway Wife Syndrome husband wife relationship problems latest news

वैवाहिक नात्यात येणारा हा दुरावा सुरुवातीला गंभीर वाटत नसला तरीही अनेकदा संवादाअभावी नातं तुटण्याची वेळ येते आणि हा मानसिक धक्का पती आणि पत्नी या दोघांनाही पचवणं कठीण असतं. त्यामुळं नातं कोणतंही असो, नात्यातील तुमची भूमिका कोणतीही असो, संवाद साधला जाणं आणि समस्येवर तोडगा काढणं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, सदर प्रकरणी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)