Election results 2019 : देशभरात अशी सुरु आहे मतमोजणी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. 

May 23, 2019, 11:33 AM IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. कोणत्या मतदार संघात कोण बाजी मारेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उमेदवारांचे भवितव्य काही तासांत देशाच्या समोर येणार आहे. कोणता उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे समोर येत आहे. 

1/6

पंजाबमध्ये भाजपाकडून सनी देओल गुरदासपूर मतदार संघातून रिंगणात उतरले आहेत, तर काँग्रेसचे सुनिल जाखर त्यांच्या विरोधात उभे आहेत.

2/6

जम्मू काश्मीर मधून डॉ. फारूक अब्दुल्ला श्रीनगर मतदार संघातून आघाडीवर आहेत, तर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह उधमपूर मतदार संघातून आघाडीवर आहेत. (छाया सौजन्य - एएनआय)

3/6

कर्नाटकामधून जनता दल (धर्मनिरपेक्ष)  पक्षाचे नेते निखील कुमारस्वामी मांड्या मतदार संघातून उभे आहेत.

4/6

पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेस पक्षाचे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर  मतदार संघातून आघाडीवर आहेत.  (छाया सौजन्य - एएनआय)

5/6

कर्नाटका : भाजपाचे तेजस्वी सूर्या दक्षिण बंगळूरू मतदार संघातून आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्गा येथून आघाडीवर आहेत.(छाया सौजन्य - एएनआय)

6/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून आघाडीवर आहेत, तर भाजपा अध्यक्ष अमित शाह गुजरातच्या गांधीनगर मतदार संघातून आघाडीवर आहेत.(छाया सौजन्य - एएनआय)