Railways Facts: 'या' देशात अद्याप रेल्वे धावलीच नाही, एक भारत शेजारील राष्ट्र

Countries Without a Railway Network : भारतीय रेल्वे देशातील जवळपास सर्व शहरांपर्यंत पोहोचली आहे. यामुळेच लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानानंतर भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. पण जगामध्ये आजही असे काही देश आहेत जिथे आजपर्यंत ट्रेन धावलेली नाही. यापैकी भारताच्या शेजारील देशाचा समावेश आहे.

Dec 15, 2022, 13:31 PM IST
1/5

Viral News Countries of the world where no trains run till today Photos

दक्षिण आशियातील सर्वात लहान देश असलेल्या भूतानमध्ये आजपर्यंत रेल्वेचे जाळे विकसित झालेले नाही. भूतान हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय सुंदर देश आहे. भारत भविष्यासाठी अशी योजना तयार करत आहे. यात भूतान रेल्वे मार्गाने जोडला जाईल.

2/5

Viral News Countries of the world where no trains run till today Photos

कुवेतमध्ये तेलाचे साठे आहेत. मात्र येथे आजतागायत एकही रेल्वे लाईन नाही. या देशात राहणारे लोक खूप श्रीमंत आहेत आणि त्यांची जीवनशैलीही हायफाय आहे. कुवेतमध्ये रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच लोकं कुवेतच्या ट्रेनमधून प्रवास करताना दिसतील.

3/5

Viral News Countries of the world where no trains run till today Photos

Viral News Countries of the world where no trains run till today Photos

अंडोराची गणना जगातील छोट्या देशांमध्येही केली जाते. कमी लोकसंख्या असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूपच लहान आहे. या देशातही आजपर्यंत रेल्वेचे जाळे विकसित होऊ शकले नाही. येथील लोक सार्वजनिक वाहनांमध्ये खाजगी वाहने किंवा बसचा अधिक वापर करतात.

4/5

Viral News Countries of the world where no trains run till today Photos

Viral News Countries of the world where no trains run till today Photos

पूर्व तिमोरमध्येही ट्रेनचे जाळे नाही. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देशात लोक रस्त्यांवरून जास्त प्रवास करतात. आता या देशात 310 किमी लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे.

5/5

Viral News Countries of the world where no trains run till today Photos

Viral News Countries of the world where no trains run till today Photos

सायप्रसमध्येही रेल्वे नेटवर्क नाही. 1950 ते 1951 पर्यंत येथे रेल्वेचे जाळे होते. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा ट्रॅक चालू ठेवता आला नाही.